आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारवर सामनातून टीका:देशाला स्वातंत्र्य मिळाले त्याचा उत्सव वर्षातून एकदा साजरा होतो; पण फाळणीची वेदना सदैव मन जाळीत असते, ही आग कशी विझवणार? मोदींना सवाल

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून १४ ऑगस्ट हा देशाचा फाळणी वेदना स्मृतीदिन म्हणून पाळण्याचं त्यांनी जाहीर केलं. यावरुन सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्याचा उत्सव वर्षातून एकदा साजरा होतो, पण फाळणीची वेदना सदैव मन जाळीत असते. ही आग कशी विझवणार? असा सवालही सामनातून करण्यात आला आहे. तसंच, फाळणीच्या वेदनेतून आणखी एका फाळणीची बीजे रोवली जाऊ नयेत हे सध्याच्या राज्यकर्त्यांनी पाहायला हवं, असं देखील म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस एक घोषणा केली, ही घोषणा काय?
पंतप्रधानांनी फाळणीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. देशाच्या फाळणीच्या वेदना विसरल्या जाऊ शकत नाहीत म्हणून 14 ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी वेदना स्मृतिदिन’ म्हणून ओळखला जाईल, अशी घोषणा आपले पंतप्रधान मोदी यांनी केली. देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना मोदी यांना फाळणीच्या वेदनेने अस्वस्थ केले व त्यांनी त्या कटू आठवणींना उजाळा दिला. फाळणी झाली. भारत-पाकिस्तान नावाचे दोन स्वतंत्र देश निर्माण झाले. दीडशे वर्षांच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठी हिंदू आणि मुसलमान अशा दोन्ही समाजांनी रक्त सांडले.

ज्या इक्बालने पुढे पाकिस्तान निर्मितीला मोठा हातभार लावला त्यानेच, ”सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा” असे अजरामर काव्य लिहिले. बॅ. जीना हेसुद्धा स्वातंत्र्यलढ्याचे एक शिलेदार होते व ते जहालपंथी टिळकांचे चाहते होते. न्या. गोखले हे जसे गांधींचे गुरु तसे जीनांचेही गुरु होते. इंग्रजांच्या बेड्यांतून देशाला मुक्त करणे हाच सगळ्यांचा ध्यास होता, पण जसजसे स्वातंत्र्य जवळ येऊ लागले तसतसे हिंदू-मुसलमानांचे झगडे सुरु झाले व त्याचा शेवट द्विराष्ट्र निर्मितीत झाला, पण विभाजन हे काही राजकारणाचा भाग किंवा खुशीखुशीने झालेले नाही. ब्रिटिशांच्या ‘फोडा आणि झोडा’ या नीतीतूनच फाळणी झाली व आपल्या स्वातंत्र्याची ती अपरिहार्यता ठरली.

बातम्या आणखी आहेत...