आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

UPA अध्यक्षपदावरुन कलह:पटोलेंना राऊतांचे उत्तर, म्हणाले- मग, दिल्लीतील विषयात महाराष्ट्रातील नेत्यांनी पडू नये! UPA अध्यक्ष पदासाठी पवारांचे नाव सूचवल्याने झाला होता वाद

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युपीएचे नेतृत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना देण्यात यावे असे वक्तव्य केले होते. यानंतर त्यांच्यावर काँग्रेस नेत्यांनी टीका केली होती. संबंध नसलेल्या विषयांवर संजय राऊतांनी बोलू नये असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राऊतांना म्हणाले होते. आता यावर संजय राऊतांनी नाव न घेता प्रत्युत्तर दिले आहे. 'संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) अध्यक्षपदाचा विषय हा केंद्रातील चर्चेचा विषय आहे. दिल्लीतील विषयांमध्ये महाराष्ट्रातील नेत्यांनी पडू नये' असा टोला आता राऊतांनी लगावला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?
संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) अध्यक्षपदाचा विषय हा केंद्रामधील आहे. राज्यातील किंवा जिल्हा-तालुका स्तरावरील नेत्यांनी यावर भाष्य करू नये. असे म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना प्रत्युत्तर दिले आहे. यासोबतच यूपीएविषयी बोलण्यासाठी यूपीएचा भाग असलेच पाहिजे, हे गरजेचे नाही. या देशामध्ये भाजपविरोधात विरोधी पक्षांची मजबूत आघाडी उभी करण्यासाठी यूपीए विषयी चर्चा व्हायलाच पाहिजे. ही गोष्ट महाराष्ट्रातील नेत्यांना उमजत नसेल तर त्यांना अभ्यास करण्याची गरज असल्याचा टोलाही संजय राऊतांनी लगावला आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, यूपीए अध्यक्षपदाचा विषय हा दिल्लीतील आहे. यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांनी यामध्ये पडू नये. सोनिया गांधी किंवा राहुल गांधींनी या विषयावर काही भाष्य केले तर आम्ही त्यांना उत्तर देऊ. भाजपला सक्षम विरोधीपक्षाची गरज आहे. देशात विरोधी पक्षांची सक्षम आघाडी उभी राहिली नाही तर भाजपचा पराभव कसा करता येईल. याचे उत्तरही या नेत्यांनी दिल्लीत बसून द्यावे, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते नाना पटोल?
संजय राऊत यांनी यूपीएचे अध्यक्षपद शरद पवारांना मिळावे असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या मागणीवर राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी यावरुन राऊतांवर टीका केली होती. संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल त्यांनी केला होता. तसेच शिवसेना ही यूपीएचा भाग नाही, यामुळे राऊतांनी संबंध नसलेल्या विषयांवर भाष्य करु नये असेही पटोले म्हणाले होते.

बातम्या आणखी आहेत...