आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगल्यावर हातोडा:मिलिंद नार्वेकरांचा बंगला जमीनदोस्त, किरीट सोमय्या म्हणाले - करुन दाखवले; पुढचा नंबर अनिल परब यांच्या रिसॉर्टचा, सोमय्यांचा दावा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा दापोलीतील बंगला जमिनदोस्त करण्यात आला आहे. मिलिंद नार्वेकर यांनी नियमांचे उल्लंघन करत आलिशान बंगला बांधल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. 'मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर मुख्यमंत्री ठाकरेंचे सचिव यांचा बेकायदा बंगला पाडण्याचे काम आता सुरु झाले आहे.' असे ट्विट सोमय्यांनी केले आहे.

पुढचा नंबर मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टचा - किरीट सोमय्या
उद्या 23 ऑगस्ट रोजी मी दापोलीला जावून या तोडकामाची पाहणी करणार आहे. पुढचा नंबर मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टचा असेल, असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...