आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Shivsena Vs BJP News And Updates 'Abdul Sattar Should Wear A Hat For The Rest Of His Life, We Will Provide Him With Hats' Girish Mahajan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाजनांचा टोला:'अब्दुल सत्तार यांनी आयुष्यभर डोक्यावर टोपी लावूनच ठेवावी, आम्ही त्यांना टोप्या पुरवू'- गिरीश महाजन

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'रावसाहेब दानवे यांचा पराभव करणे अशक्य'

'भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पराभूत करत नाही तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही', असे आव्हान महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले होते. त्यावर आता भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. 'अब्दुल सत्तार यांनी आयुष्यभर टोपी लावूनच ठेवावी, आम्ही त्यांना टोप्या पुरवू', असा टोला गिरीश महाजन यांनी सत्तार यांना लगावला आहे.

एका वृत्त वाहिनीशी संवाद साधताना गिरीश महाजन म्हणाले की, 'अब्दुल सत्तार युतीतून निवडून आले आहेत, याचे त्यांनी भान ठेवावे. रावसाहेब दानवे यांची कामे मोठी आहे. त्यांच्या मतदारसंघात त्यांनी मोठे काम केले आहे. त्यांना पराभूत करणे तेवढे सोप नाही. त्यामुळे सत्तार यांनी आयुष्यभर टोपी लावूनच ठेवावी, हवं तर आम्ही त्यांना टोप्या पुरवू', असा टोला महाजनांनी लगावला.

'राम मंदिराचा विषय जुना झाला आहे'

'भाजपचे नेते खासगीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक करतात', या सत्तार यांच्या विधानाचाही महाजन यांनी समाचार घेतला. 'भाजपचे लोक असे काहीही म्हणत नाहीत. भाजपच्या कोणत्याही नेत्याने असे कधीच म्हटले नाही. सत्तारांची बोलाची कढी आणि बोलाचाच भात आहे', असे महाजन म्हणाले. तसेच, 'भाजपचे राजकारण म्हणजे मुँह में राम बगल में छुरी', या सत्तारांच्या विधानावर महाजन म्हणाले की, 'राम मंदिराचा विषय आता जुना झाला आहे. आता तर निवडणुकाही नाहीत. त्यामुळे राम मंदिरावर बोलण्यापेक्षा आता तुम्ही तुमच्याविषयी बोला', अशी प्रतिक्रिया महाजन यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...