आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बोचरी टीका:संजय राऊत बिथरले आहेत, त्यांनी तात्काळ मानसोपचार तज्ज्ञाला दाखवावे- आशिष शेलार

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राऊतांची अग्रलेखातून भाजपवर टीका

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडीने नोटीस बजावली. त्यानंतर संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊ भाजपवर जोरदार टीका केली. याशिवाय आजच्या(दि.30) सामनातील अग्रलेखातूनही त्यांनी भाजपचा हल्लाबोल केला. त्यानंतर आता भाजपने राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. बिथरलेल्या राऊतांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना शेलार म्हणाले की, 'वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यापासून संजय राऊत ज्याप्रकारे लिहित किंवा विधाने करत आहेत, त्यावरुन ते बिथरल्याचे दिसत आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ मानसोपचार तज्ज्ञाला दाखवण्याची गरज आहे. संजय राऊतांना माझा सल्ला आहे की, त्यांनी लवकर एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार करुन घ्यावेत', असे शेलार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...