आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Short Circuit Caused In Running Car; Fire Intensifies Due To Sanitizer And Leather Seat Cover, NCP Taluka Vice president Died

मुंबई:शॉर्टसर्किटमुळे धावत्या कारने घेतला पेट; सॅनिटाझर आणि लेदर सीटकव्हरमुळे वाढली आगीची तीव्रता, राष्ट्रवादीच्या तालुका उपाध्यक्षाचा होरपळून मृत्यू

मुंबई19 दिवसांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

धावत्या कारला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्षाचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा महामार्गावर पिंपळगाव टोल प्लाझा लगत साकोरे फाटा येथे मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास धावत्या कारला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने संजय चंद्रभान शिंदे (रा. साकोरे मिग, वय 46) यांचा होरपळून मृत्यू झाला. शिंदे हे राष्ट्रवादीचे तालुका उपाअध्यक्ष असून त्यांच्या पत्नी निर्मला यांची दोनच महिन्यापूर्वी उपसरपंचपदी निवड झाली होती.

शिंदे आपल्या घरून द्राक्ष बागेच्या फवारणीसाठी लागणारी औषधे घेण्यासाठी कारने (एमएच 15, एफएन 4177) पिंपळगाव येथे जात असताना हा अपघात घडला. धावत्या कारमध्ये शॉर्टसर्किटमुळे वायरिंग जळाल्याने वाहनाने पेट घेतला. त्यानंतर कारचे दरवाजे व काचा लाॅक झाल्या. कारमध्ये सॅनिटायझरच्या बाटलीसह डिझेल टाकी व लेदर सीट कव्हर अशा ज्वलनशील वस्तू असल्याने आगीची तीव्रता आणखी वाढली. धुराचे लोट बाहेर पडू लागल्यानंतर शिंदे यांनी दरवाजे उघडण्याचा व काच फोडण्याचा प्रयत्न केला परंतु, त्यांचे प्रयत्न विफल ठरल्यामुळे आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला.