आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रथयात्रा:श्रीलंकेतून निघालेली श्रीराम वन गमन पथ काव्य रथयात्रेचे 15  मार्च रोजी नांदेडला आगमन

नांदेड7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीलंकेतील अशोक वाटिका येथून निघालेल्या श्रीराम वन गमन पथ काव्य रथयात्रेचे १५ मार्च रोजी नांदेड येथे आगमन होणार आहे. श्रीराम भक्तांनी दुपारी एक वाजता शोभायात्रेत व सायंकाळी सहा वाजता कविसंमेलनात भगवे कपडे घालून हजारोंच्या संख्येत उपस्थित राहत चरणपादुकांचे दर्शन घ्यावे, असे आवाहन ॲड. दिलीप ठाकूर, शशिकांत पाटील, गणेशसिंह ठाकूर, गणेश कोकुलवार यांनी पत्रकार परिषदेत केले.

विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा महामंत्री शशिकांत पाटील म्हणाले, महाशिवरात्रीला श्रीलंकेतील अशोक वाटिका येथून ही यात्रा सुरू झाली आहे. ६,५०० किमी अंतर पूर्ण करून रामनवमीला अयोध्या येथे जाणार आहे. रथयात्रेमध्ये चरणपादुका असून त्या योगीजींच्या हस्ते अयोध्येच्या राम जन्मभूमी मंदिरात ठेवण्यात येणार आहेत. श्रीराम जन्मोत्सव समितीचे गणेशसिंह ठाकूर म्हणाले की, १५ मार्चला दुपारी १ वाजता रेणुका माता मंदिर गाडीपुरा येथून शोभायात्रेला प्रारंभ होईल. यात्रेमध्ये ढोल पथक, भजनी मंडळ, विविध देखावे, घोडे, अठरा फूट उंचीची राम मूर्ती, चरणपादुका रथ राहणार आहे. मल्टिपर्पज हायस्कूलच्या भव्य मैदानावर सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत देशातील नामवंत कवींचे वीर रस व हास्य रसाचे अखिल भारतीय कविसंमेलन होणार आहे. श्रीराम जन्मोत्सव समिती कार्यालयात रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत श्रीराज चक्रवार, महेश देबडवार, सागर जोशी, सोनू उपाध्याय व चेतन पंडित हे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...