आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल लागत आहे. यात सर्वांचे लक्ष्य पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर आहे. दरम्यान, आतापर्यंत आलेल्या निकालानुसार, बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची सत्ता पुन्हा येताना दिसत आहे. यावरुन शिवसेना नेते आणि राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला जोरदार टोला लगावला आहे.
जळगावात प्रसार माध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, भाजपकडे बंगालचे नेतृत्त्व करणारा स्थानिक चेहरा नव्हता. त्यामुळेच राज्यातील जनतेने भाजपला नाकारले. जनतेने राज्यात कोण नेतृत्त्व करू शकतो, जनतेच्या कामांसाठी कोण पुढे येऊ शकतो, याचा विचार करूनच ममता बॅनर्जींना पुन्हा संधी दिली आहे, असे पाटील म्हणाले.
जनतेने भाजपच्या गद्दारीला चपराक दिली
गुलाबराव पुढे म्हणाले की, पश्चिम बंगालच्या निकालावरून नरेंद्र मोदींचा करिष्मा ओसरला का? यापेक्षा राज्याचा विकास कोण करू शकतो, मातीशी कोण जुळला आहे, याचा विचार मतदारांनी केला आहे. मोदींकडे जे लोक गेले होते, ते ममता दीदींचेच अपत्य होते. त्यामुळे लोकांनी 'लाश वही है, बस कफन बदल गया है', अशा प्रकारची हुशारी दाखवली आणि भाजपच्या गद्दारीला चपराक दिली, असेही पाटील म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.