आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:सिद्धेश्वर धरणाचे सहा दरवाजे उघडले; ४३६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु, पावसाचा अंदाज पाहता धरणाचे आणखी दरवाजे उघडण्याबाबत लवकरच निर्णय!

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणाच्या पाणीसंचय पातळी पूर्ण झाली असून धरणाचे सहा दरवाजे बुधवारी ता.१८ सकाळी आठ वाजता उघडण्यात आले आहे. या दरवाज्यातून ४३६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. पावसाचा अंदाज लक्षात घेऊन धरणाचे आणखी दरवाजे उघडण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

हिंगोली जिल्हयातील सिध्देश्‍वर धरणाची पूर्ण संचय पातळी ४१३ मीटर आहे. मंगळवारी ता. १७ सकाळी आठ वाजेपर्यंत ४१२.६५५ मीटर पाणी पातळी झाली होती. धरणाच्या लाभ क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढली. त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार आज सकाळी आठ वाजता धरणाचे १, १४, ७, ८, ४. ११ या क्रमांकाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. या सहा दरवाज्यातून ४३६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. धरणाचे पाणी पूर्णा नदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे. सध्या धरणाच्या लाभ क्षेत्रात पाऊस असून धरणात सुमारे ५ हजार क्युसेक पाण्याचा येवा येत असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सुत्रांनी सांगितले. लाभ क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास पुढील काळात आणखी दरवाजे उघडले जाणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष बिराजदार, अभियंता भुषण कनोज यांनी सांगितले.

दरम्यान, हिंगोली जिल्हयात मागील चोविस तासात सरासरी ५०.३० मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्हयात आता पर्यंत ८१.५८ टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यात ४९.५० मिलीमिटर, कळमनुरी ५९, वसमत ५२.५०, औंढा नागनाथ ५६.२० तर सेनगाव तालुक्यात ३५.९० मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, जिल्हयातील ३० पैकी चार मंडळात अतिवृष्टी झाली असून यामध्ये जवळाबाजार ९८, गिरगाव ८०, वारंगा ९२ तर सिरसम मंडळात ८४ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...