आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सापाचा थरार!:दोन तास घिरट्या घालणाऱ्या विषारी सापाने घेतला सहा वर्षीय मुलीला चावा, पाहा व्हिडिओ

वर्धाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सेलू तालुक्यातील बोरखेडी कला येथे सहा वर्षीय मुलीच्या भोवताल दोन तास घिरट्या घालणाऱ्या विषारी सापाने चावा घेतला असल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.

बोरखेडी कला येथील पूर्वा पद्माकर गडकरी (वय ६ वर्ष) ही मुलगी आईसोबत जमिनीवर अंथरुणावर झोपली होती. साप जवळ येताच आईला जाग आली. ती सापाला बाजूला करण्याचा प्रयत्न करीत असता, विषारी साप हा मुलीच्या भोवताल घिरट्या घालत होता. शेजारच्या नागरिकांना माहिती देण्यात आली. तरी देखील सापाने जागा सोडली नाही. दोन तासानंतर विषारी सापाने मुलीच्या हाताला मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास चावा घेतला व त्या ठिकाणाहून दिसेनासा झाला.

भयभीत झालेल्या मुलीला रात्री दोन वाजताच्या सुमारास सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याची माहिती आहे.

बातम्या आणखी आहेत...