आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारांचा पाऊस:महाबळेश्वरला गारांचा पाऊस, गारांवरुन केली पर्यटकांनी स्केटिंग

महाबळेश्वर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वादळी वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह जोरदार पडला

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जात असलेल्या महाबळेश्वर परिसरात आज सायंकाळी बर्फाची चादर पसरली होती. मुसळधार पावसासह गारांचा पाऊस पडला. बर्फाच्या चादरीवरून पर्यटकांनी स्केटिंग केली

दरम्यान, जावळी तालुक्यातही आनेवाडी, सायगाव, रायगाव, खर्शीतर्फे कुडाळ, महिगाव, मोरघर येथील परिसरात आज सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला.​

आज सायंकाळी पाच वाजलेच्या दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह व विजेच्या कडकड़ाटासह जोरदार पडला, तर बेलावडे, आर्डे, सोनागाव परिसरात गारांचा पाऊस पडला. पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेतशिवारात अजूनही पीक काढणीची लगबग सुरु असल्याने शेतकरी वर्गाची अचानक सुरु झालेल्या पावसामुळे तारांबळ उडाली होती. सध्या महाबळेश्वरात उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना आज मोठा दिलासा. दोन ते तीन दिवसांपासून संध्याकाळच्या सुमारास पडत असलेल्या पावसामुळे येथील पिकांचे नुकसान झाले असले, तरी नागरिकांचा उकाड्यापासून बचाव झाल्याचे चित्र या पावसामुळे पहायला मिळाले. सध्या येथे उन्हाच्या तीव्रतेमुळे मोठ्या प्रमाणात गर्मी वाढली होती. त्यात परिसरामध्ये वणव्यांचे प्रमाण वाढल्याने हवेत गर्मीचे प्रमाण होते, परंतु गेली दोन ते तीन दिवसांपासून सायंकाळी पडत असलेल्या पावसामुळे येथील उष्णतेचे प्रमाण कमी झाले असून हवेत गारवा निर्माण झाला आहे. सध्या येथे पर्यटकांचे प्रमाण देखील कमी झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...