आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:..तर मंत्र्यांकडे काहीच सापडायला नको, ईडीच्या कारवाईवरून चंद्रकांत पाटील यांची टीका

नांदेड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे सरकार अस्थिर करण्यासाठी धाडी टाकल्या जात असताना हे कारस्थान भाजपचे आहे, असे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून बोलले जात आहे. त्यांच्या आराेपात तथ्य असेल तर राज्य सरकारच्या मंत्र्यांकडे काही सापडायला नकाे. अनिल देशमुख यांच्याकडे ३४० काेटींची मालमत्ता जप्त कशी झाली, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. अनिल देशमुख यांना हायकाेर्ट, सुप्रीम काेर्ट जामीन फेटाळत आहे, मग त्यांच्या मते सुप्रीम कोर्ट वाईट आहे का, असा चिमटाही त्यांनी काढला. देगलूर विधानसभा पोटनिवडणूक प्रचारासाठी सोमवारी ते आले होते.

या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाटील म्हणाले की, प्राप्तिकर विभागाची एकावेळी ७० ठिकाणी छापे पडण्याची कारवाई ही सहा महिने आधी ठरते, दोन दिवसात ठरत नाही. माजी खासदार भास्कराव पाटील यांनी भाजप सोडला. पंढरपूर निवडणुकीतही कल्याण काळे राष्ट्रवादीतून आलेले नेते निवडणुकीच्या आठ दिवसांपूर्वी पुन्हा राष्ट्रवादीत गेले. पण, आम्ही निवडणूक जिंकली. भास्कराव पाटील खतगावकर राहिले असते तर मला प्रचाराला येण्याची आवश्यकता नव्हती. इतकी ही निवडणूक सोपी होती. ते गेल्यामुळे कठीण झाली असली तरी जिंकणार नाही असे काही नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

नांदेडमध्येही प्राप्तिकर विभागाची कारवाई ?
राज्यात ज्याप्रमाणे विविध ठिकाणी प्राप्तिकर विभागाच्या धाडी होत आहेत, त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यातही त्या प्रकारे कारवाई होणार का? या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी स्मितहास्य केले आणि माझ्या हसण्यावरून कारवाईबाबतचा अंदाज बांधा, असे म्हणत एक प्रकारे सूचक इशाराच दिला.

बातम्या आणखी आहेत...