आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालयात दाखल:सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पोटदुखीच्या त्रासामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटदुखीमुळे उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती होत असल्याचे ट्विट स्वतः धनंजय मुंडे यांनी केले आहे. काही महिन्यापूर्वीच त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती.

धनंजय मुंडे यांनी ट्वीट केले की, 'तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल.'

दरम्यान, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना जून महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. श्वास घेताना त्रास होत असल्याने त्यांना 12 जून रोजी तातडीने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोना झाला होता. 11 दिवसांच्या उपचारानंतर धनजंय मुंडे यांनी कोरोनावर मात केली होती.

बातम्या आणखी आहेत...