आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निधी वाटपावरुन नाराजी:काही पक्षातील आमदारांना जास्त तर काहींना कमी निधी मिळाला- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरविकास खात्याच्या निधी वाटपामध्ये काँग्रेसच्या बाबतीत दुजाभाव केला जात असल्याचे म्हणत काँग्रेसचे 11 आमदार उपोषण करणार असल्याचा इशारा कैलास गोरंट्याल यांच्याकडून देण्यात आला होता. यासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रीया दिली आहे. 'आम्ही नाराज आमदारांशी बोलून त्यांचे समाधान करू', अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिली.

यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, 'निधी वाटपावरुन काही आमदारांमध्ये नाराजी आहे, ती आम्ही बोलून घालवू. काही पक्षातील आमदारांना जास्त निधी मिळाला तर काहींना कमी मिळाला, ही वस्तुस्थिती आहे. मात्र मी त्या पक्षाचे नाव घेणार नाही. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे सर्वांना समान संधी मिळाली पाहिले, ही अपेक्षा आहे. काही घटना घडल्या आहेत, त्यात सुधारणा करू, असे स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यासंदर्भात आमदारांशी बोलून त्यांचे आम्ही समाधान करू,' असे थोरात म्हणाले.

अजित पवारांनी काढली कैलास गोरंट्याल यांची समजूत

काँग्रेसचे 11 आमदार उपोषण करणार असल्याचा इशारा कैलास गोरंट्याल यांच्याकडून देण्यात आला होता. या सर्वानंतर अजित पवार यांनी कैलास गोरंट्याल यांना फोन करत त्यांची समजूत काढली आहे. यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतल्याची माहिती आहे.

अजित पवार यांनी फोन करत कौलीाश गोरंट्याल यांची समजूत काढली. अजित पवार म्हणाले की, काँग्रेससोबत आम्ही कोणताही दुजाभाव करत नाही. मात्र यापुढे निधी वाटपाविषयी तुमच्याविषयी प्राधान्याने विचार केला जाईल. अजित पवारांनी दिलेल्या या आश्वासनानंतर गोरंट्याल यांनी उपोषण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

गोरंट्याल का होते नाराज?

कैलास गोरंट्याल हे राज्य सरकारवर नाजार होते. त्यांनी सरकार काँग्रेससोबत दुजाभाव करत असल्याचा आरोप केला होता. आरोपत असा होता की, जालना जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या ताब्यामध्ये तीन नगरपालिकांचा समावेश आहे. यामध्ये अंबड, परतूर आणि जालन्याचा समावेश होते. जिल्ह्यातील नगरपालिकेसाठी आतापर्यंत 29 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. मात्र काँग्रेसच्या नगरपालिकांना या निधीतून दमडीही दिली नसल्याचा आरोप गोरंट्याल यांच्याकडून करण्यात आला होता.