आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

इयत्ता 10 वी निकाल:मुलगा बनला आईचा शिक्षक, अन् दोघे ही झाले दहावी उतीर्ण; पुढे बारावीची परिक्षा पास होऊन पदवी मिळवण्याची महत्वकांक्षा

बारामती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभर दहावीच्या परिक्षेत उतीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. मात्र बारामती तालुक्यातील पारवडी गावातील गुरव कुटुंबात दहावीच्या परिक्षेचा निकालाचा आनंद व्दिगुणित आहे. कारण कुटुंबातील मुलगा आणि आई दोघे माय लेकर ही एका वेळी उतीर्ण झाल्याची दुर्मिळ घटना बारामती तालुक्यात घडली. विशेषतः वयाच्या 36 वर्षी आईने दोन्ही मुलांच्या मदतीने माध्यमिक शालांत परिक्षा 64.40 टक्के गुण मिळवत पास होण्याचे आपले अपुर्ण स्वप्न पूर्ण केले आहे. त्यांचा थोरला मुलगा देखील दहावीच्या परिक्षेत 73.20 टक्के गुण मिळवले. कधी कधी मुलगा आपल्या आईला अवघड गणितं इंग्रजी विज्ञान विषयाचा अनाकलनीय भाग समजावून सांगत, वर्षभर मुलगा सदानंद आपल्या आईचा शिक्षक बनला. त्यामुळे त्याचा ही अभ्यास झाला. कधी आई स्वयंपाक करताना शेजारी बसून जेवणारा दोन्ही मुलं आईला मार्गदर्शन करत. पुढे बारावीची परिक्षा पास होऊन पदवी मिळवण्याची त्यांची महत्वकांक्षा आहे.

बेबी गुरव या बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये पायोनिअर कॅलिकोज कंपनीमध्ये शिवणकाम करतात.

शिर्सुफळ (ता.बारामती) गावातील माहेरी वडिलांच्या वेडसरपणामुळे कौटोंबिक कारणामुळे त्याची दहावी पास होण्याची महत्वकांक्षा पूर्ण होऊ शकली नाही. त्यांचा मुलगा सदानंद गुरव हा रयत शिक्षण संस्थेच्या नागेश्वर विद्यालय शेटफळगढे ता. इंदापूर येथे दहावीत शिकत होता. तर धाकटा मुलगा आठवीत शिकत होता. त्यांनी पतीच्या आग्रहास्तव त्यांनी दहावीची परिक्षा देण्याचा निर्णय घेतला. पती प्रदीप गुरव दिव्य मराठीत प्रतिनिधी आहेत. त्यांनी प्रोत्साहन देत आत्मविश्वास वाढवला. बांदलवाडी येथिल बालविकास विद्यालयातून बहिस्थ विद्यार्थी व परिक्षार्थी अर्ज भरला. दररोज सकाळी सकाळी घरकाम आटोपून आठ वाजता बारामती टेक्सटाईल पार्कमधील कपंनीत काम सुरू होईपर्यंत कंपनीच्या आवारात अभ्यास करत, तर कामावरून सुटल्यावर बसस्टाॅप बसची वाट पाहत अभ्यास सुरू असे, एकुण दररोज पर्समध्ये पुस्तक घेऊनच त्या कामावर पोचत, दिवसभराच्या काबाडकष्टानंतर रात्री घरकामातून वेळ मिळताच अभ्यासात डोके घालत. त्यांनी दहावीतील यशाबद्दल आनंद व समाधान व्यक्त केले. या बातमीची विशेषता म्हणजे, 10 वीच्या पर्षीत यश संपादन केलेल्या बेबी गुरव या बारामतीमधील दिव्य मराठी प्रतिनिधीच्या पत्नी आहेत.