आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विरोधकांची बैठक:'लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूं'; ममता बॅनर्जींच्या कौतुकानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रीया

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोनिया गांधींची एनडीएचे सरकार नसलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली
  • आपल्याकडे अमेरिकेसारखी परिस्थिती उद्भवल्यास काय करायचे ?- उद्धव ठाकरे

आज सोनिया गांधी यांनी एनडीएचे सरकार नसलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. व्हिडिओ कन्फरंसिंगद्वारे झालेल्या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासह, पंजाब, राजस्थान, छत्तिसगड, झारखंड , पद्दुचेरी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री उपस्थित होत्या. यादरम्यान, उद्धव ठाकरे यांना कॅबिनेट बैठक असल्यामुळे आधी बोलू देण्याची विनंती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली. त्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 'उद्धवजी आप बहुत अच्छा फाईट कर रहे है', असे म्हटले. त्यावर उद्धव ठाकरेंनी 'लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूं' असे अभिमानाने म्हणाले.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या नेतृत्वात देशभरातील एनडीएचे सरकार नसलेल्या सात मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे चार, तर इतर पक्षांचे तीन मुख्यमंत्री सहभागी होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तिसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही नारायणस्वामी यांची उपस्थिती होती.

उद्धव ठाकरेंना कॅबिनेटची बैठक असल्यामुळे, सोनिया गांधींनी ममता बॅनर्जी यांना आधी उद्धव यांना बोलू देण्यास सांगितले. त्यावर उद्धव ठाकरे ममता दीदींना म्हणाले 'इजाजत है क्या दीदी?' त्यावर ममता यांनी 'उद्धवजी, आप बहुत अच्छा फाईट कर रहे है' अशा शब्दात त्यांचे कौतुक केले. तेव्हा उद्धव ठाकरे यांनीही 'लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूं' असे सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, 'केंद्र सरकारशी लढायचे की घाबरुन बसायचे, हे आपण ठरवायला हवे. संकट आलं की आपण एकत्रित येतो. पण आपल्याला एकत्रित यायला संकटाची गरज कशाला आहे? आपण एरवीसुद्धा भेटत राहिले पाहिजे, ज्यामुळे संकटच घाबरुन म्हणेल की हे लोक एकत्र आहेत,' असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.

आपल्याकडे अमेरिकेसारखी परिस्थिती उद्भवल्यास काय करायचे ?- उद्धव ठाकरे

यावेळी उद्धव ठाकरेंनी अद्यापही करोना संकट टळलं नसताना शाळा सुरु करण्यासंबंधी चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेत शाळा सुरु केल्यानंतर जे संकट निर्माण झाले तीच परिस्थिती आपल्याकडे उद्भवली तर काय करणार ? अशी विचारणा केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, 'अमेरिकेत शाळा सुरु केल्यानंतर 97 हजार मुलांना करोनाची लागण झाल्याचे रिपोर्ट आहेत. जर आपल्याकडे अशी परिस्थिती निर्माण झाली तर काय करणार आहोत?' असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.