आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगाेली:स्पेनच्या पीएचडी स्कॉलर डॉ. चित्रा कुऱ्हे यांच्या हाती डिग्रसवाणीची सूत्रे

हिंगाेलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेनच्या सँटिआगाे विद्यापीठातून “भारतातील आदिवासी समाज’ या विषयावर पीएडी मिळवणाऱ्या डाॅ. चित्रा कुऱ्हे यांची हिंगाेली तालुक्यातील डिग्रसवाणी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी निवड झाली. वंचित बहुजन आघाडीच्या पॅनलकडून त्यांनी निवडणूक लढवली हाेती. उपसरपंचपदी अनिता आढळकर यांची सोमवारी ता. ८ बिनविरोध निवड झाली आहे.डिग्रसवाणी येथे ९ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये वंचितचे आठ सदस्य निवडून आले होते.

सोमवारी दुपारी दोन वाजता पिठासन अधिकारी बी. पी. लहाने यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया सुरु झाली. यामध्ये सरपंचपदासाठी डॉ. चित्रा कुऱ्हे तर उपसरपंचपदासाठी अनिता आढळकर यांचेच उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर करण्यात आले. त्यांची निवड होताच गावात एकच जल्लोष करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...