आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नांदेड:केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यासाठी महास्वामींना प्रवासाची विशेष परवानगी; लॉकडाऊनमुळे नांदेडमध्ये अडकले होते

नांदेडएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • महास्वामींच्या प्रवासासाठी विशेष विमानाची साेय करण्याचे प्रयत्न सुरू

दक्षिण भारत प्रवासात लॉकडाऊनमुळे केदारपीठाचे प्रमुख जगद्गुरु श्री भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी नांदेड येथे अडकून पडले आहेत. अक्षय्यतृतीयेला केदारनाथचे दरवाजे उघडण्यासाठी त्यांना जाता यावे म्हणून लॉकडाऊनमध्येही राज्य सरकारने त्यांना प्रवासाची विशेष परवानगी दिली आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी हे पत्र महास्वामीजींच्या स्वाधीन केले. पाेलिस महासंचालकांच्या स्वाक्षरीचे हे पत्र असून त्याची प्रत पंतप्रधान कार्यालयाकडेही पाठवली आहे. त्यांच्या प्रवासासाठी विशेष विमानाची साेय करण्याचे प्रयत्न सुरू अाहेत.

केदारनाथ मंदिर ६ महिन्यांसाठी बंद झाल्यानंतर मुख्य रावल श्री भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी ६ महिने दक्षिण भारतात धर्मोपदेशासाठी भ्रमंती करतात. केदारनाथांचा सोन्याचा मुकुटही ६ महिने त्यांच्या डोक्यावर असतो. लॉकडाऊन जाहीर झाल्याने महास्वामी नांदेडला अडकून पडले आहेत. त्यांच्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून विशेष विमान पाठवण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

लाॅकडाऊनमुळे अडचणी

  • देशात लाॅकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आले आहे. रेल्वे सेवा, विमानसेवा बंद आहे.
  • रस्ता मार्गाने हा १९०१ कि.मी. तर हवाई मार्गाने हा प्रवास १३०१ कि.मी. इतका अाहे.
  • विमानाची सोय झाली नाही तर महास्वामी रस्ता मार्गाने प्रवास करतील. त्यांचा पहिला मुक्काम इंदूर, दुसरा गाझियाबाद तर तिसरा मुक्काम डेहराडूनला असेल. तेथून ते हेलिकॉप्टरने केदारनाथला जातील.

स्वामीजींच्या हस्ते सोन्याचा मुकुट

दिवाळीनंतर बर्फवृष्टीमुळे केदारनाथचे दरवाजे बंद होतात. त्यानंतर केदारनाथांची मूर्तीपूजा उखीमठ येथे केली जाते. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मंदिराचे कपाट उघडले जाते. भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते श्री केदारनाथाला सोन्याचा मुकुट चढवण्यात येतो.

बातम्या आणखी आहेत...