आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाषणातून कायदा मोडल्यास कारवाई!:दसरा मेळाव्यापूर्वी गृहमंत्री फडणवीसांचा गर्भित इशारा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्ष इशारा देताना कायद्याच्या चौकटीत राहून भाषण केले पाहिजे असे म्हटले आहे.

दसऱ्यादिवशी उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. त्यावरून आधीच वादाच्या ठिणग्या पडल्यात. आता फडणवीसांचा इशाऱ्याने या कलगीतुऱ्यात वाढच होणारय.

चौकट मोडल्यास...

भाषणे कायद्याच्या चौकटीत राहून केली पाहिजे. ही चौकट मोडल्यास कायदा आपले काम करेल. राजकारणात एकमेकांवर टीका होतच असतात. पण त्याही कायद्याच्या चौकटीतच असाव्या असे फडणवीस म्हणाले.

मेळाव्यांसाठी चोख बंदोबस्त

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कायदा आणि सुव्यवस्थेचा चोख बंदोबस्त ठेवला जाईल. दोन्ही मेळावे शांततेत पार पडावे यासाठी बंदोबस्त ठेवला जाईल. दोन्ही बाजुंच्या कार्यकर्त्यांकडूनही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी घेतली जाईल असेही ते म्हणाले.

काही घटकांवर विशेष नजर

काही घटक महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न करत आहे. त्यांनी गर्दीचा फायदा घेऊ नये याकडे आमचे लक्ष असेल असेही फडणवीस म्हणाले.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाला हजेरी लावणार

आपण कोणत्याही दसरा मेळाव्याला जाणार नसून नागपूरमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...