आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थकीत पगार:एसटी महामंडळ काढणार 2 हजार कोटींचे कर्ज; परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना महामारीमुळे तीन महिन्यांपासूनचे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार बाकी आहेत. यातच आता येणाऱ्या दिवाळी सणात एसटीची मागणी वाढते आणि त्यासाठी इंधन खर्चासह इतर गोष्टींसाठी पैसा लागतो. त्या अनुशंगाने एसटी महामंडळ 2 हजार कोटींचे कर्ज काढणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

अनिल परब यावेळी म्हणाले की, 'एसटीला मिळणारे २२ कोटींचे उत्पन्न कोरोनामुळे यंदा मिळाले नाही. सध्या एसटी साडे पाच हजार कोटींचा तोटा सहन करत आहे. संचित तोटा वाढल्यानंतर उत्पन्नाची साधने वाढली पाहिजे, नाही तर तोटाही वाढतो. कोरोनामुळे उत्पन्नाची साधने वाढण्याऐवजी उत्पन्नच बंद झाले. त्यामुळे कामगारांचे तीन महिन्यांचे पगारही थकले आहेत. त्यातच दिवाळी सारखा सण आल्याने कामगारांना पगार मिळाले पाहिजेत म्हणून आम्ही सरकारकडे 3600 कोटींचा प्रस्ताव पाठवला आहे. कोरोनामुळे राज्यालाही मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे दोन हजार कोटींचे कर्ज काढण्यात येईल', असे अनिल परब म्हणाले.