आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • ST Workers Protest । In Marathwada, The Strike Of ST Is Still Strong, The Role Of The Staff Is Firm, The Passengers Also Support The Agitation

संप काही संपेना:मराठवाड्यात एसटीच्या संपाचा तिढा कायम, कर्मचारी भूमिकेवर ठाम, प्रवाशांचाही आंदोलनाला पाठिंबा; लातूर जिल्ह्याला संपाचा सर्वाधिक फटका

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी पुकारण्यात आलेला कर्मचाऱ्यांचा संप बुधवारीही सुरूच होता. सरकारसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असताना यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. मराठवाड्यातही हे आंदोलन तीव्र होत असून बुधवारपर्यंत ३९५ कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे.

तर ४२ कोटींवर महसूल बुडाला आहे. आणखी काही दिवस प्रवाशांचे हाल होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, संपाच्या काळात मराठवाड्यात बीड जिल्ह्यातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे. लातूर जिल्ह्याचा सर्वाधिक १० कोटी ५० लाखांचा महसूल बुडाल्याचे आकडेवारीवरून समोर येते.

परभणी जिल्ह्यातील ४ आगारांतील २५ कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे. मागील दहा दिवसांत १०० टक्के बस बंद होत्या. हा संप टप्प्याटप्प्याने अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. कर्मचारीही आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. शासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. परभणी जिल्ह्यात गंगाखेड व पाथरी आगारातील प्रत्येकी ५, जिंतूरमधील ७, परभणीतील ८ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

परभणी जिल्ह्यातील ४ आगारांतून दिवसाला सरासरी २५ लाखांचा महसूल मिळतो. महामंडळात प्रशासकीय कर्मचारी, चालक, वाहक, यांत्रिकी आणि प्रशासकीय असे एकूण १ हजार ४०० कर्मचारी कार्यरत आहेत. सध्या यातील प्रशासकीय आणि यांत्रिक स्तरावरील जवळपास ४० ते ४५ कर्मचारी कर्तव्यावर हजर असल्याची माहिती परभणीचे विभाग नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांनी दिली.

नांदेड : २५६ कर्मचारी हजर

नांदेड जिल्ह्यात बुधवारी संपाचा १६ वा दिवस होता. २ हजार ९५३ कर्मचारी संपावर आहेत. २५६ कर्मचारी कामावर आहेत. ६२ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यात वाहक, चालक, यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकही बस सुरू झालेली नाही.

लातूर : संपाचा २१ वा दिवस

लातूर जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप २७ ऑक्टोबरपासून सुरू आहे. बुधवारी संपाचा २१ वा दिवस होता. जिल्ह्यातील २ हजार ८४६ कर्मचाऱ्यांपैकी २ हजार २६२ कर्मचारी संपावर आहेत. बहुतांश सर्व चालक आणि वाहक संपावर आहेत.

जिल्ह्यात १२८ कर्मचारी वैद्यकीय रजेवर आहेत. ऑफिस स्टाफ व यांत्रिक विभागातील ४५६ कर्मचारी कामावर आहेत. जिल्ह्यात एसटीला दररोज सरासरी ३० लाखांचे उत्पन्न मिळते. दिवाळीत हे उत्पन्न ५० लाखांवर जाते. संपकाळात सर्व महसूल बुडाला आहे. जिल्ह्यात एकही बस सुरू झाली नाही.

मुख्यमंत्र्यांना २०० पत्रे पाठवली

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागला. यामुळे आता शासनाने त्यांच्या मागण्या मान्य करून तातडीने यावर तोडगा काढावा, अशी अपेक्षा प्रवाशांतून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद शहरातील नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना २०० पेक्षा अधिक पोस्टकार्ड पाठवून मुख्यमंत्र्यांकडे कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची विनंती केली आहे.

मराठवाड्यात संपाची स्थिती अशी

जिल्हा निलंबित बुडालेला कर्मचारी महसूल
औरंगाबाद ६१ ५ कोटी ५० लाख
जालना २९ २ कोटी ९७ लाख
परभणी २५ २ कोटी ५० लाख
हिंगोली १५ ३ कोटी २० लाख
नांदेड ६२ ८ कोटी
बीड ८७ ५ कोटी ५० लाख
लातूर ६० १० कोटी ५० लाख
उस्मानाबाद ५६ ४ कोटी ४० लाख

बातम्या आणखी आहेत...