आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परीक्षांना प्रारंभ:जेईई मुख्य परीक्षेला प्रारंभ, राज्यात सव्वा लाख विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट

पुणे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शैक्षणिक क्षेत्रात सर्वांत महत्त्वाची मानली जाणारी जेईई (जॉईंट एन्ट्रन्स एक्झॅमिनेशन) मुख्य परीक्षा सोमवारपासून देशभरात सुरू झाली. महाराष्ट्रात सुमारे सव्वा लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत. सोमवारी आर्किटेक्चर आणि प्लॅनिंग या विद्याशाखांसाठीची मुख्य परीक्षा घेण्यात आली. अभियांत्रिकी विद्याशाखांसाठीच्या परीक्षांना मंगळवारपासून सुरवात होणार आहे. महाराष्ट्रात एकूण २३ शहरांत ही परीक्षा होत आहे.

सोमवारी सकाळी साडेसातपासून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर प्रवेश देण्यात आला. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचे विविध नियम आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून परीक्षा पार पाडण्यात आली. पुणे जिल्ह्यामधून सुमारे २८ हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत. पुण्यात या परीक्षेसाठी दोन केंद्रांची सुविधा देण्यात आली आहे. यंदा विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी पाच महिन्यांचा कालावधी मिळाल्याने कटऑफ उंचावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पहिल्या दिवशी पेपर्सची काठिण्य पातळी फारशी नसल्याचे मत विद्यार्थ्यांनी नोंदवले आहे. सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा आणि दुपारी तीन ते सायंकाळी सहा, अशा दोन सत्रांत परीक्षा होणार आहे. नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशांनुसार, विदर्भातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोचणे शक्य न झाल्यास, त्यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) संपर्क साधावा, अशी सूचना देण्यात आली आहे. मुंबई विभागातील विद्यार्थ्यांसाठी पश्चिम रेल्वेने विशेष गाड्यांची सोय केली आहे. ही सुविधा ६ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना उपलब्ध असेल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser