आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • State Animal Husbandry, Sports And Youth Welfare Minister Sunil Kedar Tested Corona Positive, Admitted At Breach Candy Hospital In Mumbai

कोरोनाचा विळखा:राज्याचे पशुसंवर्धन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांना कोरोनाची लागण, मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे पशुसंवर्धन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. केदार यांचा कोरोना अहवाल (दि. ३) रोजी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

सुनील केदार यांनी नागपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर ते मुंबईला रवाना झाले होते. ३ सप्टेंबर रोजी सकाळी त्यांना ताप चढला व काहिसे अस्वस्थ वाटत असल्यामुळे ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन कोरोनाची अ‍ॅन्टीजन चाचणी केली. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येताच उपचारासाठी दाखल झाले असून,त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

केदार यांनी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी व पावसामुळे नुकसान झालेल्यांची पाहणी करतेवेळी अनेक अधिकारी त्यांच्या सोबत असल्यामुळे नागपूर येथील कर्मचाऱ्यांनाही खबरदारी म्हणून चाचणी करून घेतली आहे.

0