आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • State Government Issues Guidelines For Unlock; Hotels, Restaurants Open While Metro, Cinema Hall, Swimming Pool Closed

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनलॉक-5:50% क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्तरॉला परवानगी; राज्य सरकारकडून अनलॉकच्या गाईडलाईन्स जारी

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहा महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील हाॅटेल्स, रेस्टॉरंट येत्या सोमवारपासून खुली होणार आहेत. राज्यात लांब पल्ल्याची रेल्वेसेवाही सुरू होत अाहे. राज्य सरकारने बुधवारी अनलॉक-५च्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. हाॅटेल्स, रेस्टाॅरंट, बार ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, स्विमिंग पूल, शाळा ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहतील. राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुरू करायला मुभा दिली आहे. राज्याच्या परवानगीशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवास मात्र करता येणार नाही. अत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय अन्य उत्पादनाचे उद्योग सुरू करणे व ऑक्सिजन निर्मिती व त्याच्या वाहतुकीवरदेखील कसलेही निर्बंध नसतील.

१ हाॅटेल, रेस्टॉरंट क्षमतेच्या ५०% चालवायची आहेत. मात्र त्यात क्षमता कमीअधिक करण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना ठेवण्यात आला आहे.

२ हाॅटेल, रेस्टाॅरंट, बार, फूड कोर्ट यांच्यासंदर्भात पर्यटन विभागाकडून स्वतंत्रपणे सुनिश्चित कार्यपद्धती (एसओपी) जारी करण्यात येणार आहे.

काय सुरू (५ ऑक्टोबर ) :

> हॉटेल, रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट ५०% क्षमतेने. > राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वेसेवा. > अत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय अन्य उत्पादनाचे उद्योग सुरू करण्यास परवानगी. > ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर निर्बंध नाहीत. > मुंबईच्या डबेवाल्यांना लोकलमधून प्रवास. > पुणे विभागातील लोकल ट्रेन. > मुंबई महानगर क्षेत्रात लोकल फेऱ्यांत वाढ.

हे बंदच

>चित्रपटगृहे, पोहण्याचे तलाव, मनोरंजन पार्क्स, नाट्यगृहे, बँक्वेट हाॅल. > शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस. > मेट्रो वाहतूक. > शासनाच्या संमतीविना परदेशी प्रवास. > सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळाच्या स्पर्धा तसेच मोठे सार्वजनिक कार्यक्रम. > प्रतिबंधित क्षेत्र.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser