आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • State Government To Probe Prabhakar Sail's Death, Orders Given To DGP, Home Minister Dilip Walse Patil's Statement

कॉर्डेलिया ड्रग्ज प्रकरण:प्रभाकर साईल मृत्यू प्रकरणाची राज्य सरकार चौकशी करणार, पोलिस महासंचालकांना दिले आदेश, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे वक्तव्य

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्डिलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याचा मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. पोलीस महासंचालकांना याबाबतचे आदेश दिले असल्याचे त्यांनी म्हटले. शुक्रवारी दुपारी प्रभाकर साईलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, साईलच्या मृत्यूमुळे संशयास्पद परिस्थिती निर्माण झाली आहे. ही अचानक घडलेली घटना आहे. त्यामुळे या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशीचे आदेश पोलिस महासंचालकांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसात प्रभाकर साईलच्या मृत्यू प्रकरणी चौकशी अहवाल येण्याची शक्यता आहे. कार्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणा अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. एनसीबीने केलेल्या या कारवाईत प्रभाकर साईल हा पंच होता. एनसीबीच्या या कारवाईवरून अनेक आरोप प्रत्यारोप झाले. साईल हा एनसीबीच्या कारवाईत असलेल्या किरण गोसावीचा बॉडीगार्ड होता. एनसीबीने केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आरोप सुरू केल्यानंतर साईलने केलेल्या गौप्यस्फोटामुळे खळबळ उडाली होती.

राष्ट्रवादीची सीआयडी चौकशीची मागणीप्रभाकर साईल यांच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता राष्ट्रवादीने सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, कार्डिलिया ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने फर्जीवाडा करुन केलेल्या कारवाईतील एनसीबीचा पंच आणि एनसीबीची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे उघड करणारा प्रभाकर साईल याचा हृदयविकाराने मृत्यू झाला पण मृत्यूमागे घातपाताची शक्यता आता व्यक्त होत असून राज्यसरकारने या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी तपासे यांची आहे.

काय आहे कार्डीलिया ड्रग्ज प्रकरण

कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा एनसीबीने पर्दाफाश केला होता त्यानंतर एकच खळबळ उडाली. या क्रूझवरुन अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलाही अटक करण्यात आली होती. या प्रकरणाची संपूर्ण देशात चर्चा झाली. या क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाच्या तपासासाठी एनसीबीने एक विशेष चौकशी समितीची स्थापना केली होती. या चौकशी समितीचा अहवाल आला असून एनसीबीने स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या अहवालानुसार अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानकडे कोणतेही अंमली पदार्थ नव्हते. तसेच आर्यन खानचा कोणत्याही मोठ्या ड्रग्ज रॅकेटशी संबंध नाही असेही तपासात समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...