आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यात आदर्श शिक्षक पुरस्काराचा राज्य शासनालाही विसर पडला असून शिक्षकदिन दोन दिवसांवर आल्यानंतर अद्यापही पुरस्कार जाहिर केलेच नाही. त्यामुळे राज्यातील शिक्षकांमधून नाराजीचा सुर उमटू लागला आहे. विशेष म्हणजे प्राध्यापक शिक्षण मंत्र्यांना शिक्षकांचा विसर कसा पडला असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
राज्यात दरवर्षी (ता. ५) सप्टेंबर रोजी राज्य शासनाकडून उत्कृष्ठ शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. यामध्ये प्राथमिक गटातून ३८, माध्यमिक गटातून ३७ तसेच ८ शिक्षीकांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षीका पुरस्कार दिला जातो. तसेच आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या १८ प्राथमिक शिक्षक व दिव्यांग २ तर एका विशेष शिक्षकाला पुरस्कार दिल्या जातो. दरवर्षी जुलै महिन्यापासून पुरस्काराची प्रक्रिया सुरु होते. या प्रक्रियेत जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर मुलाखती होऊन त्यानंतर पुरस्काराची घोषणा केली जाते.
मात्र यावर्षी अद्यापही राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा झालीच नाही. त्यामुळे राज्यातील शिक्षकांमधून नाराजीचा सुर उमटू लागला आहे. शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी शिक्षकांना पुढे केले जात असतांना शिक्षकांच्या कौतुकाच्या वेळी शासन मागे का राहते असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यातच राज्याचे शिक्षणमंत्री प्राध्यापक असतानाही त्यांना शिक्षकांच्या कौतुकाचा विसर कसा पडला असा सवालही उपस्थित केला जात आहे.
राज्यातील शिक्षकांवर अन्याय- व्ही. पी. फुलतांबकर, राज्याध्यक्ष माध्यमिक शिक्षक संघटना
राज्यातील शिक्षक शासनाच्या विविध उपक्रमात काम करतात. सध्या कोरोनाच्या काळातही शिक्षक जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. मात्र त्यानंतरही राज्य शासनाला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचा विसर पडावा हे अनाकलनीय आहे. शासनाकडून शिक्षकांवर अन्याय होत आहे. ता. ५ सप्टेंबर रोजी केवळ थंँक्यू म्हणून चालणार नाही तर शिक्षकांचा गौरव झालाच पाहिजे.
यावर्षी लिंकच दिली नाही
दरम्यान, शासनाने सन २०१८ पासून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार शासनाकडून लिंक दिली जाते. त्यावर प्रस्ताव दाखल करू इच्छिणाऱ्या शिक्षकांनी प्रस्ताव दाखल करणे अपेक्षीत आहे. मात्र यावर्षी शिक्षकांना प्रस्ताव दाखल करण्यासाठी लिंकच उपलब्ध करून दिली नसल्याचे शिक्षकांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.