आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा कोसळणार!:बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार; महाराष्ट्रात 26 ते 29 सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात रविवारपासून पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पुढील 12 तासात हे चक्रीवादळाचे रूप घेणार आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रात 26 ते 29 सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्याचसोबत वाऱ्यांचा वेग देखील अधिक राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीमुळे रविवारपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार शक्यता आहे.

2021 मधील हे तिसरे चक्रीवादळ
बंगालच्या उपसागरात 2021 मध्ये निर्माण होणारे हे तिसरे चक्रीवादळ असेल. याआधी तौक्ते, यास चक्रीवादळे आली होती. दरम्यान, 2011 ते 2021 सालात सप्टेंबर महिन्यात निर्माण होणारे हे तिसरे चक्रीवादळ आहे.

बातम्या आणखी आहेत...