आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Statewide Agitation Of Maratha Samaj, State Government's Application To The Supreme Court; Movement In Front Of MLA MP's House In Solapur, Nanded

मराठा आरक्षण:राज्यभर आंदोलने, राज्य सरकारचा सुप्रीम कोर्टात अर्ज; सोलापूर, नांदेडला आमदार-खासदारांच्या घरांसमोर आंदोलन

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर येथे सोमवारी सकल मराठा समाजाच्यावतीने भव्य वाहन रॅली काढण्यात आली.
  • पहिले पाऊल : स्थगिती उठवण्यासाठी मोठ्या खंडपीठाकडे विनंती

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडे विनंती अर्ज दाखल करण्यात आला. सरकारने सर्वांशी चर्चा करून एकमताने हे पाऊल उचलल्याचे आरक्षणाची जबाबदारी सोपवलेले मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. मराठा समाजाचा सरकारवरचा दबाव वाढतो आहे. त्यामुळे स्थगिती उठवण्याची मागणी करण्याचा निर्णय सरकारने सोमवारी घेतला. दरम्यान, सोलापूर, नांदेड,जळगाव, औरंगाबाद जिल्ह्यांसह राज्यात ठिकठिकाणी सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा आदी विविध संघटनांनी विद्यमान खासदार, आमदारांच्या घरांसमोर जोरदार आंदोलन केले.

अंतरिम स्थगितीमुळे महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार मोठ्या कोंडीत सापडले आहे. महाविकास आघाडी सरकारवर चाेहोबाजूंनी टीका सुरू आहे. राज्यात पुन्हा क्रांती मोर्चे निघण्याची सरकारला भीती आहे. त्यामुळे राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी पहिले पाऊल टाकले. मोठे खंडपीठ आता कोणता निर्णय देते त्यावर आरक्षणाचे भवितव्य अवलंबून आहे.

मुख्यमंत्री भूमिका मांडणार :

विनंती अर्ज करून राज्य सरकारने कोंडी फोडण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे. राज्य सरकारच्या वतीने यावर एक-दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सविस्तर भूमिका मांडतील, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

अखेर हा निवडला पर्याय :

मराठा समाजातील असंतोष कमी करण्यासाठी पुन्हा अध्यादेश, फेरविचार याचिका, आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या योजनांचा लाभ देणे असे पर्याय राज्य सरकारसमोर होते. त्यातील आदेश निरस्त करण्याची विनंती करण्याचा मार्ग सरकारने निवडला.

आंदोलन, वाहन रॅलीने सोलापूर दणाणले

सोलापूर शहर, पंढरपूर, अकलूजसह जिल्हा आंदोलन, वाहन रॅलीने दणाणला. शहरात खासदार शिवाचार्य महास्वामी यांच्या मठासमोर त्याचप्रमाणे प्रणिती शिंदे, सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख या तीन आमदारांच्या घरांसमोर सकल मराठा समजाच्या वतीने आसूड आंदोलन करण्यात आले. या वेळी मराठा वाहन रॅलीही काढण्यात आली होती.