आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळ रायगडच्या दिशेने:25200 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले, नुकसानीचा अंदाज बांधणे कठीण

अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली/ मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वादळाचा परिघ 35 किमी, याच क्षेत्रात वाऱ्याचा वेग अधिक

तौक्ते चक्रीवादळाने शनिवारी रात्री उशिरा दिशा बदलली. ते १०० किमी पूर्वेकडे सरकले आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर रात्री ते धडकण्याची शक्यता असून या भागातून सुमारे अडीच हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान, रविवारी दुपारी हे वादळ रौद्ररूप धारण करून गोव्यापासून १२० किमी अंतरावरून पुढे सरकले. मात्र, यामुळे ताशी ६० ते ७० किमी वेगाने वारे आणि पावसाने दाणादाण उडवून दिली. केरळमध्ये आता या वादळाचा जोर ओसरला असून वाऱ्याचा वेगही मंदावला आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सध्या वादळामुळे जोरदार वारे वाहत आहेत.

वादळाचा परिघ ३५ किमी, याच क्षेत्रात वाऱ्याचा वेग अधिक
या वादळाच्या केंद्राचा परिघ ३० ते ३५ किमी असून या कक्षेबाहेर फार ढग नाहीत किंवा अति वेगवान वारेही नाहीत. या परिघात मात्र ताशी १५० किमी वेगाने वारे वाहत आहेत. हे वादळ किनारपट्टीवर धडकेल तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी १०० ते १२० किमी होईल असा अंदाज आहे. तेव्हा या वादळाचे रौद्ररूप दिसेल. वादळाने दिशा थोडी बदलल्याने ते गुजरातमधील द्वारकेला न धडकता आता १८ मे रोजी पाेरबंदर व महुआदरम्यान दीवच्या भागांत धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईसह कोकणात या वादळाच्या प्रभावामुळे जोरदार पाऊस आणि वारे पाहता पूर्ण खबरदारी घेण्यात आली असून शहरातील जम्बो कोविड सेंटरमधील रुग्णांना स्थलांतरित करण्यात आले आहे. रुग्णालयांचा वीजपुरवठा व आॅक्सिजन याची खबरदारी घेण्यात येत आहे.

कर्नाटकात चौघांचा मृत्यू, गोवा-महाराष्ट्रात मुसळधार

  • वादळामुळे कर्नाटकात चौघांचा मृत्यू झाला. ७ जिल्ह्यांत ७३ गावे प्रभावित झाली असून ३०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीवर ५६ पथके सज्ज आहेत.
  • गोव्यात अनेक घरांमध्ये पाणी घुसले. मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता. किनारपट्टीवर एनडीआरएफची १०१ पथके तैनात. सर्वात मोठा धोका गुजरातला.
बातम्या आणखी आहेत...