आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव वसतीगृह प्रकरण:पोलिसांनी महिलांना कपडे काढून नाचवल्याचा गंभीर आरोप, गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश; पोलिस म्हणाले- व्हिडिओ फक्त आरोप करणारेच!

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
आमच्याकडे आरोप करणारा व्हिडिओ असून त्या आधारे सध्या तपास सुरू आहे - पोलिस
  • ...तर राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी लागेल- सुधीर मुनगंटीवार

जळगावमधील एका महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचण्यास भाग पाडण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यात पोलिसांवर सुद्धा आरोप केले जात आहेत. या घटनेचे पडसाद आज अधिवेशनात उमटले. भाजप आमदार श्वेता महाले यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आणि याबाबत कारवाईची मागणी केली. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही घटनेची गंभीर दखल घेत दोषींवर नियमाने कारवाई होईल, असे आश्वासन दिले.

याबाबत अधिवेशनात बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, जळगावमधील वसतीगृहात घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. घटनेची चौकशी करण्यासाठी चार उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल दोन दिवसांत प्राप्त होईल. जी घटना घडली त्याची संपूर्ण माहिती घेण्याचे काम सुरू आहे. व्हिडीओ आणि इतर सर्व माहिती एकत्र केला जात असून जबाबही नोंदवले जात आहेत. याची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर कडक कारवाई करण्यात येईल.'

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आक्रमक

भाजप आमदार श्वेता महाले यांनी याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली. यावर गृहमंत्र्यांनी नोंद घेऊ, असे म्हटले. यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी लागेल, असा थेट इशारा दिला. 'सभागृहात सदस्यांनी अतिशय गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. हा इतका गंभीर विषय आहे अध्यक्ष महोदय की, उद्या माझी बहीण, तुमची बहीण एवढे एक सेकंद नजरेत आणा. अशा पद्धतीने तुमच्या, माझ्या आई बहिणीला नग्न करुन, कपडे काढून नाचायला लावले जाते आणि आम्ही नोंद घेवू म्हणतात. तुम्ही एका तासात चौकशी करतो. काय कारवाई करणार आहे याचा अहवाल घेतो, असे म्हणायला हवे. पण म्हणता नोंद घेतो, हे पाप फेडावे लागेल,' असे टीकास्त्र मुनगंटीवार यांनी सोडले.

नेमके प्रकरण काय आहे ?

जळगावमधील एका NGO च्या टीमने हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या तरुणी आणि महिलांसोबत बातचीत केल्यावर हे प्रकरण समोर आल्याचा दावा केला. या प्रकरणाचा उलगडा मंगळवारी करत एनजीओकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांसमोर पुरावे म्हणून या प्रकरणाशी संबंधित व्हिडिओ सादर करण्यात आले असा दावा करण्यात आला.

फक्त आरोप करणारे व्हिडिओ हाती -पोलिस

परंतु, पोलिस अधीक्षक प्रविण मुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे, व्हिडिओ व्हायरल झाले ते फक्त आरोप करताना महिलांचे आहेत. फक्त आरोप केले जात आहेत. अश्लील व्हिडिओ तर कुठेच नाही. फक्त आरोप करणारा व्हिडिओ आल्याने इतका गोंधळ उडाला. आमच्याकडे जो आरोप करतानाचा व्हिडिओ आहे, त्याला आधार मानत पुढील तपास करणे हे आमचे काम आहे आणि तपास सुरू आहे.

चौकशीच्या नावाखाली केले शोषण

आरोपानुसार, घटना 1 मार्चची आहे. चौकशीच्या नावाखाली काही पोलिस आणि कर्मचारी हॉस्टेलमध्ये दाखल झाले. त्यांनी कथितरित्या तरुणींचे कपडे काढून डान्स करायला भाग पाडले. ज्या तरुणींनी याचा विरोध केला, त्यांना मारहाण झाली. याबाबत माहिती घेण्यासाठी एक सामाजिक कार्यकर्ते तेथे गेले, त्यांना आत जाऊ दिले नाही. यानंतर तरुणींनी खिडकीतून ओरडून घडलेला सर्व प्रकार सांगितला. ज्या वेळेस त्या तरुणी घडलेला सर्व प्रकार सांगत होत्या, तेव्हा हॉस्टेलचे कर्मचारी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत होते.

बातम्या आणखी आहेत...