आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

परीक्षा अर्ज प्रक्रिया:जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी 11 सप्टेंबर पासून अर्ज प्रक्रिया, 16 सप्टेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक
  • अर्जाचे शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख ही 17 सप्टेंबर

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) दिल्ली ने जेईई अॅडव्हान्स परीक्षेच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेचे सूचना पत्र अधिकृत संकेतस्थळावर जाहिर केले आहे.

या सूचनापत्रानुसार जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया ही ११ सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. अधिक माहिती आणि अर्ज नोंदणीसाठी विद्यार्थी jee.adv.ac.in या संकेतस्थळावर पाहू शकता. १६ सप्टेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. तर अर्जाचे शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख ही १७ सप्टेंबर आहे. यंदा कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आतापर्यंत दोनवेळा परीक्षा स्थगित करण्यात आली होती. तर जेईई मेन्स आणि नीट परीक्षा घेवू नयेत, पुढे ढकलण्यात याव्यात यावरुनही वाद-विवाद सुरु आहेत. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये. तसेच भविष्यातील इतर संधीवर परिणाम होवू नये. असे कारण देत जेईई परीक्षा ही निर्धारित १ ते ६ सप्टेंबर दरम्यान ऑनलाइन होणार आहे.

जेईई मेन्स परीक्षेत पात्र ठरलेले अडीचलाख विद्यार्थी हे जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र असणार आहेत. मेन्स परीक्षेचा निकाल हा १० सप्टेंबरपर्यंत जाहिर करण्यात येणार असून, जेईई अॅडव्हान्स परीक्षा ही २७ सप्टेंबर रोजी होणार आहे. या परीक्षेसाठीचे हॉलतिकीट हे २१ सप्टेंबर पासून देण्यात येतील. तर आर्कीटेक्ट अभ्यासक्रमास प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्कीटेक्चर अॅप्टीट्यूट टेस्ट द्यावी लागेल. यासाठी ५ ते ६ ऑक्टोंबर दरम्यान नोंदणी करता येईल. परीक्षा ८ ऑक्टोंबर रोजी होणार असून, ११ ऑक्टोंबर रोजी याचे निकाल जाहिर करण्यात येणार आहेत.