आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शैक्षणिक शुल्क 30 टक्के माफ करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या गाडीसमोर आंदोलन केले. यादरम्यान, पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
धुळ्यातील अखिल भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांना अब्दुल सत्तार यांची भेट घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी पालकमंत्र्यांना भेटण्याचा अनेकवेळा प्रयत्नदेखील केला. पण, भेट होऊ शकली नाही. अखेर अखिल भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सत्तारांची गाडी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करत अडवली. विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यादरम्यान, गोंधळ वाढताच पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ 12 ते 15 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.