आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Sugar Factory Will Not Be Allowed To Start Unless There Is A 150% Increase In The Wages Of Sugarcane Workers; MLA Suresh Dhas's Warning

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाढील मोबदला:ऊसतोड कामगारांच्या मजुरीत 150% वाढ केल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही; आमदार सुरेश धस यांचा इशारा

बीड5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऊसतोड कामगारांच्या मजुरीत 150% वाढ केल्याशिवाय कारखान्याचे चाक फिरू देणार नाही, असा इशारा आमदार सुरेश धस यांनी दिला आहे. लवादाचे प्रमुख म्हणतील तो अंतिम शब्द राहिल, मात्र ऊसतोड कामगारांसह मुकादम यांच्यावर अन्याय होऊ देणार नसल्याची भूमिकाही सुरेश धस यांनी घेतली.

पत्रकारांशी बोलतना धस म्हणाले की, "मागील कराराच्या अंतरिम वाढीसह ऊसतोड कामगारांच्या मागण्या मान्य केल्याशिवाय कोणताही कारखाना सुरू होऊ देणार नाही. कामगारांना मागील पाच वर्षातल्या अंतरिम वाढीसह 150 टक्के वाढ द्यावी, तसेच मुकादमांचे कमिशन 37 टक्क्यांपर्यंत वाढवावे. तसेच, नवरा-बायको ऊसतोड कामगार जोडीला 416 रुपये मिळतात. परंतू मिस्त्री, बिगारी कामगार इतर कामावर असलेले मजूर सकाळी 11 ते 5 या वेळेतच काम करतात तर ऊसतोड कामगार रात्रंदिवस काम करुनही त्यांना योग्य मोबदला मिळत नाही. ऊसतोड कामगारांवर अन्याय होत आहे, त्यामुळे ऊसतोड कामागारांच्या गळतीचे प्रमाण मागील पाच वर्षात 60 टक्क्यांवर गेले आहे. ऊसतोड कामगारांचे मुकादम, त्यांचे प्रतिनिधी यांनी माझ्या निवासस्थानी भेट घेतली. ऊसतोड कामगारांच्या संघटनांच्या या मागणीला माझा पाठिंबा आहे', असे सुरेश धस म्हणाले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser