आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड:प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या, एकाच चितेवर दोघांवर अंत्यसंस्कार; हिमायतनगर तालुक्यातील घटना

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडी येथे ‘साथ जियेंगे साथ मरेंगे’ च्या अणाभाका घेत प्रेमी युगलानी लिंबाच्या झाडाला लायलोन दोरीनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता.22) पहाटे तीन वाजताच्या दरम्यान घडली. दोघांवरही एकाच चित्तेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कामारवाडी येथील अविवाहित दत्ता गणेश भिंगोरे (वय 24) व विवाहित शारदा खंडू माने (वय 25 वर्ष रा. चिकाळा हमु. कामारवाडी) यांच्यात प्रेम संबंध जुळवून आले. विशेष म्हणजे नवर्‍याशी जुळून येत नसल्याने विवाहिता ही चार वर्षांपासून मामाकडे कामारवाडी येथेच वास्तव्यात होती. दरम्यान, काही दिवसांपासून त्यांच्या नातेवाईकांना दोघांच्या प्रेमाची कुणकुण लागली. शारदाही विवाहित असल्याने दत्ता यांच्या घरच्यांनी दोघाच्या प्रेम संबंधाला टोकाचा विरोध दर्शविला असावा. आता दत्तांच्या घरच्यांनी त्याचे लग्न करण्याचे ठरविले होते. सोयरीकही जुळवून आली होती. परंतू, दत्ताने शारदासोबत ‘साथ जियेंगे साथ मरेंगे’च्या अणाभाका घेतल्या होत्या. आता दत्ताचे लग्न होणार असल्याने शारदाला त्याच्यापासून कायमचे दुर व्हावे लागणार होते. आगामी काळात येणार्‍या विरहाचा विचार करून दोघेही विचमग्न होते. अखेर टोकाचा निर्णय घेत शनिवारी (ता.22) पहाटे तीन वाजताच्या दरम्यान, गावाशेजारील चंद्रकुमार गणपतराव वानखेडे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला लायलोन दोरीने गळफास घेऊन दोघांनीही या जगाचा निरोप घेतला.

ही घटना उघडकीस आल्यानंतर कामारवाडी गावचे पोलीस पाटील नागोराव गोविंदराव भिंगोरे यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्याला कळविल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला. दोघांचे ही मृतदेह हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण नाईक, आरोग्य सेवक संतोष नारखेडे यांनी शवविच्छेदन करून दोघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिलेे. कामारवाडी येथे दुपारी उशिरा एकाच चित्तेवर या दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या गंभीर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार हेमंत चोले हे अधीक तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...