आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यांच्या माथी मारले ‘स्वस्त’ व्हेंटिलेटर्स:पीएम केअर व्हेंटिलेटर्सचा भाजपशासित राज्यांतूनच पुरवठा

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो. - Divya Marathi
फाइल फोटो.
  • रुग्णांच्या जिवावर ‘मेक इन इंडिया’

“आम्ही व्हेंटिलेटर्सच्या उत्पादनातील तज्ज्ञ नाही, मात्र देशातील सध्याची मागणी लक्षात घेता आम्ही हे व्हेंटिलेटर्स डिझाइन आणि उत्पादित केले आहेत. “मेक इन इंडिया मिशन’ डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे व्हेंटिलेटर्स उत्पादित केले आहेत,’ हे शब्द आहेत राजकोटच्या ज्योती सीएमसी कंपनीच्या वेबसाइटवरील. पीएम केअर फंडासाठी अवघ्या १० दिवसांत ही व्हेंटिलेटर्स तयार केल्याचा ज्योती सीएमसी कंपनीचा दावा आहे. या फंडातून सर्वाधिक व्हेंटिलेटर्सची मागणी मिळालेल्या बंगळुरूच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीनेही “आत्मनिर्भर भारत’ अभियानांतर्गत अवघ्या ४ महिन्यांत ३० हजार व्हेंटिलेटर्सची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे दोन्ही कंपन्या भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमधील असून त्यांच्याकडून २ हजार कोटींचे व्हेंटिलेटर्स खरेदी करण्यात आले आहेत.

‘पीएम केअर’मधून दिलेल्या व्हेंटिलेटर्सची परिस्थिती
‘पीएम केअर’मधून दिलेल्या व्हेंटिलेटर्सची परिस्थिती

कोरोनाच्या पहिल्या लाटेत अतिगंभीर रुग्णांसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर्सची कमतरता भासू लागल्यावर पीएम केअर फंडातून ६० हजार व्हेंटिलेटर्सची ऑर्डर देण्यात आली होती. त्यातून महाराष्ट्रात दाखल झालेली व्हेंटिलेटर्सचा पीएसआर - प्रेशर सपोर्ट व्हेंटिलेटर - ४५ वरून २१ वर ड्रॉप होत असल्याने ते कोविड रुग्णालयातील अतिगंभीर रुग्णांसाठी वापरता येत नसल्याचे “दिव्य मराठी’च्या राज्याव्यापी पडताळणीतून सिद्ध झाले.

व्हेंटिलेटर्स पुरवणाऱ्या कंपन्यांचा लेखाजोखा
१. ज्योती सीआमसी : गुजरातमधील राजकोट येथील कंपनी. कंपनीचे मालक मुख्यमंत्र्यांच्या जवळचे. कंपनीतर्फे गुजरात सरकारला १००० व्हेंटिलेटर्सची देणगी.

२. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड : कर्नाटक सरकारची ही कंपनी. “पीएम’ फंडातील सर्वाधिक ३०,००० व्हेंटिलेटरची ऑर्डर. या उत्पादनातून १५०० कोटींचा नफा.

३. एग्वा हेल्थ केअर : हरियाणातील नॉयडा येथील कंपनी. १० लाखांचे व्हेंटिलेटर्स १.५ लाखात तयार केल्याचा दावा. गेल्या वर्षी जेजे हॉस्पिटल आणि सेंट जॉर्ज हॉस्पिटलने चालत नसल्याने ८१ व्हेंटिलेटर्स परत पाठवले.

४. एएमटीझेड : आंध्र प्रदेश मेडिटेक झोन या सरकारी प्रकल्पातील ही कंपनी. व्हेंटिलेटर्स निर्मितीचा अनुभव, मात्र ट्रीव्हीट्रॉन या सबकंपनीला उपठेका. ठेका मिळाल्यानंतर ट्रीव्हीट्रॉनने डिझाइन व उत्पादन केल्याचा खुलासा.

कंपनीकडून दुरुस्तीबाबत प्रतिसाद नाही

काही जिल्ह्यांत कनेक्टर नाही, तर काही ठिकाणी कंपनीकडून दुरुस्तीबाबत प्रतिसाद न मिळाल्याने ते पडून आहेत. आरोप-प्रत्यारोप सुरू असले तरी गेल्या वर्षी याच व्हेंटिलेटर्सबाबत भाजपची सत्ता असलेल्या गुजरातमध्येही बोंब उठली होती.

पीएमओने दिले चौकशीचे आदेश
पीएम केअर फंडातून खरेदी केलेल्या व्हेंटिलेटर्सबाबत वाद वाढल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने इन्स्टॉलेशनची स्थिती आणि तक्रारींची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. आरोग्य मंत्रालयाने संसदेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात या वर्षी १२ मार्चला सांगितले होते की, १,८५० कोटी रुपये खर्च करून खरेदी केलेले ३८,८६७ व्हेंटिलेटर्स राज्यांना पाठवले आहेत. त्यापैकी ३५,२६९ इन्स्टॉल झाले आहेत. सरकारनुसार, ९० टक्क्यांपेक्षा जास्त व्हेंटिलेटर्स इन्स्टॉल झाले होते. गेल्या वर्षी ४ ऑगस्टला आरोग्य सचिवांनी संसदीय समितीला सांगितले होते की, कोविडच्या १५ टक्के रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासते. त्यापैकी फक्त ५ टक्क्यांनाच व्हेंटिलेटर द्यावे लागते. समितीने नोव्हेंबर, २०२० मध्ये अहवाल सादर केला होता तेव्हा राज्यांना १८,०१३ व्हेंटिलेटर्स मंजूर झाले होते आणि १४,६१६ चे वितरण झाले होते.

बातम्या आणखी आहेत...