आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:सुरतच्या अतिरेक्यास नवापुरातून अटक, 9 महिने ठिकाणे बदलून पोलिसांना गुंगारा, गुजरात पोलिसांची कारवाई

नवापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत शहरातील गुजसीटोक या गुन्ह्यातील आरोपीला गुजरात पोलिसांच्या सुरत एटीएस पथकाने नवापूर येथून रविवारी रात्री अटक केली. मोहंमद अशरफ नागोरी असे या आरोपीचे नाव आहे. त्याला अहमदाबाद येथे नेण्यात आले आहे. आरोपी नागोरी हा गेल्या ६-७ महिन्यांपासून नवापुरात वास्तव्यास होता.

सुरतच्या लालगेट ठाण्यात गुजरात कंट्रोल ऑफ टेररिझम ऑर्गनायझ्ड क्राइम अॅक्टनुसार गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी मोहंमद अशरफ नागोरी (रा.रामपुरा पस्तागिया शेरी, लालगेट, सुरत) सुरत येथून पसार होऊन पश्चिम बंगाल येथे खोट्या नावाने राहत होता. तेथून २-३ महिन्यांनंतर तो नवापुरात आला होता. तो मागील नऊ महिन्यांपासून वास्तव्याचे ठिकाण बदलत होता. त्याच्या तपासासाठी एटीएसचे पोलिस निरीक्षक सी.आर. जाधव यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मोहंमद अशरफ नागोरी हा नवापूर शहरात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुजरात एटीएसच्या टीमने त्याच्या मुसक्या आवळल्या. गुजरात एटीएसच्या टेक्निकल तथा ह्यूमन सर्व्हेलियन्स आधारे आरोपीला पकडण्याचे ऑपरेशन यशस्वीपणे पार पडले.

नागोरीविरुद्ध २४ गुन्हे ...
नागोरीविरुद्ध २४ गुन्हे दाखल आहेत. त्याला २००३ मध्ये सुरत व अहमदाबाद येथे पोटाअंतर्गत अटक केली होती. २०१३ ते २०१५ मध्ये पेसाअंतर्गत सुरत पोलिसांनी पकडले होते.२००५ ते २०१० दरम्यान हसमुख लालवाला यांच्यावर गोळीबार प्रकरणात ७ वर्षे शिक्षा झाली होती. २००३ मध्ये जिहादी गुन्ह्यात पोटांतर्गत अटक झाली होती. या गुन्ह्यात ५४ आरोपींना पकडले होते.

बातम्या आणखी आहेत...