आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत आत्महत्या प्रकरण:YouTube वर फेक न्यूज टाकून 4 महीन्यात कमवले 15 लाख रुपये, मुंबई पोलिसांनी बिहारमधून युट्यूबरला घेतले ताब्यात

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर YouTube वर फेक न्यूज पोस्ट करणाऱ्या एका YouTuber ला मुंबई पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. त्याच्यावर आरोप आहे की, त्याने या खोट्या बातम्यांमधून मागील चार महिन्यात 15 लाखांपेक्षा जास्तीची कमाई केली. याप्रकरणी शिवसेनेच्या लीगल सेलचे वकील धर्मेंद्र मिश्रा यांनी तक्रार दाखल केली होती.

राशिद सिद्दीकी(25) असे आरोपीचे नाव आहे. तो बिहारमध्ये एक सिव्हिल इंजिनिअर आहे. तसेच, तो YouTube वर 'एफएफ न्यूज'नावाचे एक चॅनेल चालवतो. मिश्रा यांच्या तक्रारीनंतर सिद्दीकीविरोधात मानहानी, सार्वजनिकरीत्या बदनामी करणे आणि जाणीवपूर्वक अपमान केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. परंतू, न्यायालयाने सिद्दीकीला जामीन मंजूर केला असून, त्याला चौकशीत सहयोग करण्यास सांगितले आहे.

मुंबई पोलिस, महाराष्ट्र सरकार, मंत्री आदित्य ठाकरे आणि अभिनेता अक्षय कुमार विरोधात सिद्दीकीच्या खोट्या बातम्यांना YouTubers वर लाखो व्हिव्ह मिळाले आहेत. तसेच, तपासात समोर आले की, YouTube वर सुशांतच्या मृत्यू संबंधी बातम्या टाकून सिद्दीकीने 6.5 लाख रुपयांचा कमाई केली.

सुशांतच्या मृत्यूनंतर वाढले 1.7 लाख सबस्क्रायबर

यापूर्वी मुंबई सायबर पोलिसांनी दिल्लीचे वकील विभोर आनंदला अटक केले होते. आनंदवर सुशांतच्या मृत्यू संबंधी फेक न्यूज पोस्ट करणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबाबत अपशब्द वापरण्याचा आरोप आहे. आनंदनेही या व्हिडिओतून हजारो सबस्क्रायबर मिळवले होते. सिद्दीकीकडे सुशांतच्या मृत्यूपूर्वी दोन लाख सबस्क्राइब होते, नंतर ते वाढून 3.70 लाख झाले.