आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Sushant Singh Rajput Suicide CBI Update | Maharashtra Home Minister Anil Deshmukh Says, No CBI Investigation Will Be Conducted In Sushant Singh Rajput Death Case

सुशांत आत्महत्या प्रकरण:कोणत्याही परिस्थितीत सीबीआय चौकशी होणार नाही- गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुटुंबाकडून पाटण्यात एफआयआर दाखल झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारवर प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा दबाव बनत आहे

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाला दररोज नवीन वळण मिळत आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसह 6 जणांवर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि त्याची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यादरम्यान, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी परत एकदा स्पष्ट केले की, मुंबई पोलिस या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सक्षम आहेत, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात येणार नाही.

रिया चक्रवर्तीने केली होती सीबीआय चौकशीची मागणी

याप्रकरणी स्वतः रिया चक्रवर्तीनेही काही दिवसांपूर्वी गृह मंत्री अमित शाह यांना ट्विटरवर टॅग करुन याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

या मोठ्या नावांनी सीबीआय चौकशीची मागणी केली

रिया चक्रवर्तीच्या आधी अभिनेता शेखर सुमन, कंगना रनौतसारख्या कलाकारांनीही सीबीआय चौकशीची मागणी केली होती. याशिवाय बिहारमधून पप्पू यादव, तेजस्वी यादव आणि चिराग पासवानसारख्या नेत्यांनीही सीबीआय चौकशीची मागणी केली. भाजपकडून खा. मनोज तिवारी आणि सुब्रमण्यम स्वामींनी सीबीआय चौकशीची मागणी केली.