आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:एफआयआर दाखल झाल्यानंतर रिया चक्रवर्तीची पहिली प्रतिक्रीया, म्हणाली- मला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, सत्याचा विजय होईल

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी पाटण्यात अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात एफआयआर दाखल झाली. त्यानंतर आता रिया चक्रवर्तीची पहिली प्रतिक्रीया समोर आली आहे. रियाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. देवावर आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचे रिया या व्हिडिओत म्हणत आहे. 20 सेकंदाच्या या व्हिडिओत रियाने माध्यमांवर निशाना साधला आहे.

रिया व्हिडिओत म्हणाले की, "मला देव आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला न्याय नक्की मिळेल. माध्यमांमध्ये लोक माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत. मी माझ्या वकिलांमार्फत उत्तर देईल. सत्याचा विजय होईल."