आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Suvidha Chavan | Maharashtra Thane Municipal Corporation Woman Officer Suvidha Chavan Climbed Down A Manhole; News And Live Updates

कर्तव्यदक्षता:मुंबईत गटार स्वच्छ आहे की नाही हे तपासण्यासाठी स्वतः गटारात उतरल्या महिला अधिकारी, म्हणाल्या- पावसाळ्यात हे स्वच्छ नसतील तर पाणी साचेल

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिवंडी महानगरपालिकेच्या महिला अधिकारी सुविधा चव्हाण यांचे सध्या सर्वच स्तरांतून कौतूक होत आहे. कारण ही तसेच आहे. महिला अधिकारी असलेल्या सुविधा चव्हाणने गटार स्वच्छ आहे की नाही? हे पाहण्यासाठी चक्क गटारात उतरल्या. तपासणीदरम्यान, त्यांना स्वच्छतेच्या कामावर संशय आला होता. त्यामुळे त्यांनी एका शिडीच्या साह्याने गटारीत उतरत पाहणी केली. काही ठिकाणी त्यांना अपेक्षेप्रमाणे स्वच्छता पाहायला मिळाली. पण अनेक ठिकाणी मात्र घाण दिसल्याने त्यांनी संबंधित आधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच फटकारले.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या गटारे साफसफाईचे काम वेगाने सुरू आहे. दरम्यान, हे सर्व काम ठेकेदारांना सोपविण्यात आले होते. संबंधित कामात चुक होऊ नये यासाठी सुविधा चव्हाण सगळीकडे फिरुन मॅनहोलची पाहणी करीत आहे. मंगळवारी चव्हाण या तपासणीसाठी निजामपूर भागाची पाहणी करतानाचा एक व्हिडियो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या एका गटारीत उतरुन त्यांची पाहणी करीत असल्याचे दिसून येत आहे.

साडीच्या वेशात महिला अधिकारी उतरली मॅनहोलमध्ये
विशेष म्हणजे त्या दिवशी महिला अधिकारी सुविधा चव्हाण यांनी साडी नेसली होती. दरम्यान, त्यांनी आपल्या कंपड्यांची पर्वा न करता आपले काम प्रामाणिकपणे केले. त्यामुळे त्यांचे सर्वच स्तरांतून कौतूक होत आहे. मॅनहोलच्या तपासणीदरम्यान त्यांनी सफाईचे कामगारांशीही संवाद साधला असून त्यांना योग्य काम करण्याचे निर्देश दिले.

असे करताना कोणतीही भीती नाही- सुविधा चव्हाण
हा आमचा कामाचा भाग असल्याने असे करताना कोणतीही भीती वाटली नसल्याचे सुविधा चव्हाण म्हणाल्या. जर पावसाळ्यात गटारींची योग्यप्रकारे साफसफाई झाली नाहीतर पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्या पुढे म्हणाल्या की, मी बरेचदा ऐकले होते की, गटारांच्या साफसफाईअभावी अनेकदा पाण्याने भरतात. त्यामुळे आता शहरातील प्रत्येक गटार स्वच्छ आहे याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...