आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Swabhimani Farmers Association Aggressive Across The State; Where Milk Baths, Tankers Left On The Road For Price Hike

दूध दरवाढीसाठी आंदोलन:राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; दरवाढीसाठी कुठे दुधाने अंघोळ, कुठे टँकर सोडले रस्त्यावर

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा येथे दुधाने सामूहिक अंघोळ करून निषेध करताना स्वाभिमानीचे पदाधिकारी.
  • कोल्हापूर, सांगलीत टँकरमधील दूध रस्त्यावर सोडले

दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, दूध पावडरची आयात बंद करून निर्यातीला चालना मिळावी ही मागणी घेऊन संपूर्ण राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर, सातारा, सांगलीसह नगर, नाशिक, पुणे, जालना जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी हजारो लिटर दूध रस्त्यावर सांडून दिले. बुलडाण्यात “स्वाभिमानी’चे रविकांत तुपकर व इतर कार्यकर्त्यांनी दुधाने अंघोळ करत दरवाढीची मागणी केली. कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखाना परिसरातील टिटवे येथे गोकुळ दूध संघाचा टँकर तर सांगलीत दुसरा टँकर अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर सोडून देण्यात आले. दुसरीकडे, राज्याचे पशू आणि दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी मंत्रालयात बोलावलेल्या बैठकीत दूध दरवाढीबाबत तोडगा निघालेला नाही.

मिनरल वाॅटर २० रु. लिटर, दुधाला १७ रुपये भाव

बुलडाण्यात “स्वाभिमानी’चे रविकांत तुपकर व कार्यकर्त्यांनी दुधाने अंघोळ केली. नंतर घरोघरी जाऊन ५०० लिटर दुधाचे वाटप करत सरकारचा निषेध केला. मिनरल वॉटर २० रुपये लिटर आणि दूध १७ रुपये लिटरने विकले जाते. त्यामुळे आम्ही दुधाने अंघोळ करून याचा निषेध करत असल्याचे तुपकर यांनी सांगितले. याशिवाय राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

दूध उत्पादकांना मदतीची भूमिका : मंत्री केदार

दूध उत्पादकाना मदतीची सरकारची भूमिका आहे. गेल्या सरकारने ५ रुपये अनुदानाचा निर्णय घेतला. मात्र अनेकांना लाभच मिळाला नाही. हे टाळण्यासाठी प्रयत्न करू. - सुनील केदार, दुग्धविकासमंत्री.