आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांवरुन देशभरातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या 8 डिसेंबरच्या 'भारत बंद' मध्येकाँग्रेस पक्षाचा उस्फुर्त सहभाग आहे. उच्चपदस्थ सूत्रांनुसार पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सगळ्या प्रदेश शाखांना पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून या आशयाचे आदेश दिले गेले आहेत. यासोबतच राज्यभरातील विविध भागांमध्ये हा बंद पाळला जात आहे. महाविकास आघाडी सरकारचा या बंदाला पाठिंबा आहे. तसेच राज्यभरात शेतकऱ्यांसाठी आंदोलक हे रस्त्यावर उतरले आहेत.
महाराष्ट्रात ठिकठिकाणी भारत बंदला सुरुवात झाली आहे. पुणे, जालना,नाशिक, नागपूरमध्ये बाजारपेठांमध्ये शांतता पाहायला मिळतेय. तर काही ठिकाणी शेतकरी संघटनांकडून शांतते निषेध नोंदवला जातोय. तर जालन्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध वाटप करून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला जात आहे. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे बालकांना तसेच ग्रामस्थांना दूध वाटप करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने केले जाणार असल्याचे शेतकरी संघटनेकडून जाहीर करण्यात आले आहे.
बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांसह चेन्नई-अहमदाबाद एक्सप्रेस मलकापूर रेल्वे स्थानकावर अडवली आहे.
Maharashtra: Swabhimani Shetkari Saghtana staged 'Bharat Bandh Rail Roko' protest and briefly stopped a train today in Malkapur of Buldhana dist. They were later removed from the tracks by Police & detained.
— ANI (@ANI) December 8, 2020
Farmer Unions have called #BharatBandh today, over Centre's #FarmLaws pic.twitter.com/syREnd7Iez
यासोबतच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे आज लाक्षणिक उपोषण करणार आहेत. सकाळी दहा वाजेपासून राळेगणसिद्धीमध्ये त्यांच्या उपोषणाला सुरुवात होणार आहे.
औरंगाबाद शहरातील बाजारपेठाही बंद
औरंगाबाद शहरातील बाजारपेठांमध्ये कडकडीत बंद पाळला जात आहे. अत्यावश्यक सुविधा वगळता सर्वच व्यवहार पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. औरंगाबाद शहरातील गुलमंडी, पैठण गेट, निराला बाजार आणि कॅनॉट प्लेस कडकडीत बंद, सिडको या परिसरांमध्ये व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली आहेत.
औरंगाबादेतील दिल्ली गेट येथे आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.