आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात स्वच्छतेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी शासनाकडून १०० दिवसांचा धडक कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. मार्चअखेरपर्यंत १९,६२४ गावे पाणंदमुक्त प्लस घोषित केली जाणार आहेत. त्यासाठी राज्याच्या स्वच्छ भारत मिशन कक्षाने सूक्ष्म नियोजनही केले आहे. राज्यात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा क्रमांक दोनअंतर्गत २०२४-२ या वर्षापर्यंत राज्यातील सर्व गावे ओडीएफ प्लस (पाणंदमुक्त अधिक) जाहीर करण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये सन २०२१-२२ या वर्षात ११ जिल्हे आणि १९,६२४ गावे ओडीएफ प्लस घोषित करण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून राज्यासाठी लागणारा २,९६२ कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे. त्यासाठी स्वच्छ भारत मिशन कक्षाला उद्दिष्ट ठरवून िदले आहे. आता १०० दिवसांचा धडक कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. यात सार्वजनिक स्वच्छतागृहाचेही बांधकाम केले जाणार आहे. एक शोषखड्डा स्वच्छतागृहाला दुसरा शोषखड्डा तयार केला जाणार आहे. यासोबतच नव्याने शोषखड्डे तयार करणे, नाडेप व कंपोस्ट खतनिर्मिती तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे यामध्ये केली जाणार आहेत.
यासंदर्भात स्वच्छ भारत मिशन कक्षाने पाठवलेल्या पत्रांमधून १०० दिवसांत त्या त्या जिल्ह्यांनी उद्दिष्टपूर्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच प्रत्येक भागात घ्यावयाची कामे, स्वरूप व उद्दिष्टे नमूद करून त्यानुसार कामे करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. या उपक्रमांचा प्रधान सचिवांकडून वेळोवेळी आढावाही घेतला जाणार आहे.
मिशन हंड्रेड डेज : ११,१२७ सार्वजनिक स्वच्छतागृहे
{ ९७,७३१ नादुरुस्त स्वच्छतागृहांची दुरुस्ती { ४०,५४३ ठिकाणी नॅडेप व कंपोस्ट खत तयार केले जाणार { २२,१७३ ठिकाणी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन { ११,१२७ सार्वजनिक स्वच्छतागृहांचे काम
{ १.७१ लाख एक खड्डा स्वच्छतागृह दोन खड्ड्यांचे करणे { २.१९ लाख वैयक्तिक स्वच्छतागृहांचे काम { १३.६० लाख शोषखड्डे तयार करणार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.