आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तौक्तेचा तडाखा:2542 घरांची पडझड, 7 जणांचा मृत्यू तर 12500 लोकांचे स्थलांतर

मुंबई/अहमदाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रात धुमाकुळानंतर गुजरातला धडकले वादळ

सात दिवसांत भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या समानांतर अरबी समुद्रात १२०० किमीचा प्रवास करत तौक्ते चक्रीवादळ सोमवारी रात्री ९:३० च्या सुमारास गुजरात किनारपट्टीवर दीवजवळच्या उना गावाला धडकले. वादळाच्या मध्यभागी वाऱ्याचा वेग तब्बल ताशी १८५ किमी इतका होता. जमिनीशी धडकताच तो ताशी १६० किमी झाला. दमण-दीव व गुजरातच्या किनाऱ्यावर मुसळधार पाऊस सुरू होता.

तत्पूर्वी, सोमवारी वादळाने मुंबई, कोकणासह महाराष्ट्राच्या इतर भागांत धुमाकूळ घातला. या तडाख्यात राज्यात ७ जणांचा मृत्यू, तर ९ जण जखमी झाले. वसई, उल्हासनगर, नवी मुंबई येथे प्रत्येकी १, रायगड जिल्ह्यात दोन महिलांसह ३, तर सिंधुदुर्गमध्ये दोघांचा बळी गेला. राज्यात एकूण १२,५०० जणांना सुरक्षित स्थळी हलवले. राज्यात २,५४२ घरांची अंशत:, तर ६ घरांची पूर्ण पडझड झाली. मुंबईत मुसळधार पावसाने शहर व उपनगरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले. शेकडो वृक्ष उन्मळून पडले. मुंबई किनाऱ्याजवळ दोन नावा भरकटल्या. त्यात ४१० लोक आहेत. बचावासाठी आयएनएस कोची व आयएनएस कोलकाता तैनात केले आहेत.

राज्यात अतोनात नुकसान, शेकडो संसार उघड्यावर; मदतकार्य वेगाने करा : उद्धव ठाणे जिल्ह्यात २४, पालघर ४, रायगड १७८४, रत्नागिरी ६१, सिंधुदुर्ग ५३६, पुणे १०१, कोल्हापूर २७, सातारा येथे ६ बांधकामांची पडझड झाली. रायगड व रत्नागिरी येथे प्रत्येकी २ अशी चार जनावरे मरण पावली आहेत. मुंबईत ३ कोविड केंद्रांतील रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी नुकसानग्रस्त जिल्ह्यांचा आढावा घेतला. मदतकार्य वेगाने करण्याचे निर्देश दिले.

गुजरातमध्ये २ लाख लोक सुरक्षित स्थळी, समुद्रातून सर्व नौका माघारी बोलावल्या गुजरातमध्ये १७ जिल्ह्यांतील २ लाख लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले. १९,८११ मच्छीमारांना समुद्रातून माघारी बोलावण्यात आले आहे. समुद्रात गुजरातची एकही बोट नाही. सर्वाधिक प्रभावित पोरबंदर, जुनागड, गीर-सोमनाथ, अमरेली आणि भावनगर या ५ जिल्ह्यांतून १.२५ लाख लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले. एनडीआरएफच्या ४४ आणि एसडीआरएफच्या १० तुकड्या तैनात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र, गुजरात, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी व दमण-दीवच्या उपराज्यपालांशी चर्चा केली.

मुंबईत ताशी ११४ किमी वेगाने वारे वाहिले, ११ तासांत ५५ उड्डाणे रद्द, लोकल रेल्वेही ठप्प मुंबईत अनेक ठिकाणी ११४ किमीच्या वेगाने वारे वाहिले आणि पाऊस झाला. त्यामुळे दिवसभर विमान उड्डाणे रद्द केली. लोकल रेल्वेही बंद झाली होती. सोमवारी रात्री १० वाजता मुंबई विमानतळ पुन्हा सुरू झाले. दिवसभरात ११ तासांत ५५ उड्डाणे रद्द झाली. शहरात २४ तासांत मुसळधार पाऊस आणि १२० किमीच्या वेगाने वारे वाहतील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली. रत्नागिरीत सर्वाधिक ४०० मिमी पाऊस पडला.

आता पुढे काय होणार?
जमिनीवर धडकल्यानंतर चक्रीवादळ कमकुवत होत जाईल. तथापि, संपूर्ण गुजरातमध्ये त्याच्या प्रभावामुळे मंगळवारीही दिवसभर पाऊस होईल.राजस्थानमध्ये पोहोचताना वाद‌ळ कमजोर होईल. १८ मेच्या दुपारपर्यंत कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होऊन वादळ हिमालयाकडे सरकेल.

वादळाचा गेटवे...
मुंबईत सायंकाळी ४ वाजता समुद्राला मोठी भरती आली. ३.९४ मीटर उंच लाटा उसळल्या. गेटवे आॅफ इंडिया, हाॅटेल ताजसह मरीन ड्राइव्हवर लाटांचे तांडव झाले.

बातम्या आणखी आहेत...