आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएचडी परीक्षा:स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षकांना पीएचडीसाठी पेट परीक्षेमधून सूट

नांदेड7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत शिक्षकांना पीएचडीसाठी पेट परीक्षेमधून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक शिक्षकांना डॉक्टरेट होण्यासाठी आता ‘पेट’ परीक्षा उत्तीर्ण होण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती असे पदव्युत्तर विभागाचे सहा. कुलसचिव पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी दिली. शिक्षकांना काही अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. सलग दहा वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असावा. शिक्षकांचे दोन शोध निबंध नामांकित व मान्यताप्राप्त संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित झालेले असावे. शासनाचे मान्यता पत्र, अनुभव प्रमाणपत्र व संबंधित संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र आणि प्रसिद्ध झालेले दोन शोधनिबंध प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...