आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाची धास्ती:पॉझिटिव्ह रिपोर्ट येताच गुरुजी भूमिगत; शिक्षण विभाग हैराण; 72 शिक्षकांना लागण, पण काही जण सापडेनात

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यात चाचणी केलेल्या ७२ शिक्षकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी सर्व शिक्षकांशी संपर्क करण्यात आला. पण यातील काही शिक्षक भूमिगत झाल्याचे उघड झाले आहे. शिक्षण विभागासोबतच आरोग्य विभागाचे कर्मचारीही हैराण झाले आहेत. आता या शिक्षकांना तातडीने संपर्क साधून रुग्णालयात भरती होण्याबाबत कळवावे, अन्यथा पोलिस कारवाई करण्याचा इशारा संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना शिक्षण विभागाने दिला आहे.

हिंगोलीत इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या ३२६ शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांच्या कोरोनाचा चाचण्या करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार इयत्ता २६०० शिक्षकांना चाचण्या करून त्याचे अहवाल सादर करण्याबाबत कळवण्यात आले. त्यानुसार संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांच्या आदेशानुसार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वॅबचे नमुने तपासणीसाठी दिले. त्यानुसार दररोज सुमारे १०० ते १५० नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले होते. जिल्ह्यात २,६३० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमूने तपासल्यानंतर त्यापैकी ७२ शिक्षक कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. तर उर्वरीत २५८ शिक्षकांचे अहवाल अद्यापही येणे बाकी आहेत. लागण झालेले नेमके किती शिक्षक भूमिगत झाले याची माहिती दिली जात नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, या शिक्षकांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करणे तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना विलगीलकरण कक्षात दाखल करून त्यांचेही स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्याच्या हालचाली आरोग्य विभागाने सुरू केल्या होत्या. मात्र संपर्कच होईनासा झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने या संदर्भातील माहिती शिक्षण विभागाला दिली. त्यावरून संपर्क साधण्याबाबात मुख्याध्यापक, प्राचार्यांना सूचना दिल्या आहेत. शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने संबंधित शाळांना सोशल मीडियाद्वारे संदेश पाठवला असल्याचे कळते.

भरती होत आहेत
पॉझिटिव्ह आलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी रुग्णालयात भरती होत आहेत. त्यांचा सामाजिक संपर्क देखील शोधला जात आहे. रविवारी ता. २९ या दिवशी पॉझिटिव्ह आलेले शिक्षक भरती होणे बाकी आहेत. डॉ. शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, हिंगोली.

मुख्याध्यापकांना सूचना दिल्या
पॉझिटिव्ह आलेल्या शिक्षकांना उपचारासाठी दाखल करण्याचे काम सुरू आहे. सर्व मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकाऱ्यांना संबंधित शिक्षकांशी संपर्क साधून त्यांना उपचारासाठी दाखल होण्यास सांगितले आहे. पालकांचे संमती पत्र आहे. त्या ठिकाणी शाळा सुरू केल्या जाणार आहेत. पी. बी. पावसे, शिक्षणाधिकारी, हिंगोली

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser