आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिरंगा फडकावून विश्वविक्रम:प्रजासत्ताकदिनी आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर 'किलीमांजारो'वर टीम 360 एक्सप्लोरर मार्फत फडकला तिरंगा

तळोदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 360 एक्सप्लोरर टीमचे अनिल वसावे यांनी केले शिखर सर

प्रजासत्ताक दिनानिमित्त 360 एक्सप्लोर ग्रुपद्वारे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखराच्या मोहिमेत महाराष्ट्राच्या युवकाने इतिहास घडवत देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करून मोहीम यशस्वी केली आहे. 26 जानेवारी रोजी सकाळी 11.15 वाजता नंदुरबार येथील अनिल वसावे यांनी किलीमांजारो शिखरावर भारताच्या संविधानाची प्रस्तावना वाचून व भारताचा सर्वात मोठा तिरंगा फडकावून विश्वविक्रम केला आहे.

आफ्रिकेतील टांझानिया देशातील हे शिखर असून याची उंची समुद्र सपाटी पासून 19,341 फूट आहे. अतिशय खराब वातावरणात शून्याच्या खाली तापमान, गोंगावत वाहणारे वारे, उभी चढण, पडणारा बर्फ या सर्वांमधून अतिशय काळजीपूर्वक यांनी ही मोहीम पूर्ण केली आहे. या शिखराच्या चढाईसाठी त्यांनी 19 जानेवारी रोजी सुरवात केली होती. असा आगळावेगळा व देशाला अभिमानास्पद विक्रम केल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. येत्या काळात अनिल वसावे ३६० एक्स्प्लोरर च्या माध्यमातून युरोप व ऑस्ट्रेलीया खंडातील सर्वोच्च शिखर सर करणार आहेत.

अनिल वसावे यांचे घर व कुटुंबातील सदस्य
अनिल वसावे यांचे घर व कुटुंबातील सदस्य

आमच्या प्रत्येक पावूलावर एक मोठे साहस होते. आफ्रिकेतील हे शिखर सर करणे माझ्या कुटुंबासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद, मित्रांची व अनेक बड्या मंडळींनी साथ दिल्यामुळे माझे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले आहे. एकातमीक आदिवासी विकास विभाग प्रकल्प ऑफिस तळोदा. आदिवासी शिक्षक संघ नंदुरबार,जैन इरीगेशन जळगाव, नंदुरबार जिल्हा पत्रकार बंधू यांचे आभार -अनिल वसावे (गिर्यारोहक, नंदुरबार)-

यांनी जे यश संपादन केले आहे त्याचा सर्वाना अभिमान आहे. संविधान वाचून पूर्ण भारतीयांना अभिमानास्पद कामगिरी यांनी केली आहे.अतिशय प्रतिकूल वातावरणात त्यांनी जी चढाई केली आहे त्याला कशाची तोड नाही. 360 एक्स्प्लोरर च्या माध्यमातून अनेकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.-आनंद बनसोडे (CEO, 360 एक्स्प्लोरर)

एव्हरेस्टवीर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आंनद बनसोडे यांच्या टीमसोबत आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर किलो मांजरो या शिखरावर ३६० एक्स्प्लोर्सच्यावतीने चढाई करण्याकरिता अक्कलकुवा तालुक्यातील बालाघाटच्या अनिल वसावेची निवड झाल्याने त्याला पुढील तयारीसाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड .के.सी.पाडवी यांच्या हस्ते ३ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. अतिदुर्गम भागात राहणाऱ्या अनिलला गरिबीच्या परिस्थितीमुळे मोहिमेवर जाणे शक्य नव्हते. ही बाबत पालकमंत्री पाडवी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने मदत देण्याबाबत आदिवासी विकास विभागाला सूचना दिल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...