आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी:वाळू वाहतुकीसाठी 55 हजारांचा हप्ता; सोनपेठचे तहसीलदार ताब्यात

परभणी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉ. आशिषकुमार बिरादारांविरुद्ध एसीबीची कारवाई

परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ येथील तहसीलदार डॉ. आशिषकुमार बिरादार ५५ हजार रुपयांच्या लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले आहेत. वाळूच्या ट्रकची वाहतूक करताना कुठलीही कारवाई न करण्यासाठी मासिक हप्ता म्हणून रक्कम मागण्यात आली होती.

सोनपेठ तहसील कार्यालयातील संगणक ऑपरेटर सय्यद इसाक सय्यद रहीममार्फत (३०) लाचेचे ५५ हजार स्वीकारले जात होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (२ ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. या प्रकरणाबाबत सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधकच्या नांदेड परिक्षेत्रातील पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनात हिंगोलीतील पोलिस उपअधीक्षक नीलेश सुरडकर, परभणीचे पोलिस उपअधीक्षक भरत हुंबे यांनी केली.

प्रकरण काय?
तहसिलदार आशिषकुमार बिरादर यांनी तक्रारदाराला पोहडुळ येथे सुरू असलेल्या रेतीच्या वाहतुकीवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी 55 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान तहसीलदार बिरादर यांनी आपल्या कार्यालयातील संगणक आॅपरेटरव्दारा ही रक्कम स्वीकारली असताना ही कारवाई करण्यात आली.

या पथकाने केली कारवाई
सदरील घटनेत तहसिलदार बिरादर यांना रंगेहात अटक करण्यासाठी कल्पना ब्रोकर, पोलिस अधीक्षक, नांदेड परिक्षेत्र आणि अर्चना पाटील अप्पर पोलिस अधीक्षक नांदेड परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश सुरडकर, पोलीस उपअधीक्षक हिंगोली, श्री भरत हुंबे पोलीस उप अधीक्षक परभणी यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, या प्रकरणाबाबत सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...