आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • 'Temples Will Start In The Next Eight To Ten Days, Thanks To The Chief Minister And The Government' Prakash Ambedkar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंदिरांसाठी आंदोलन:'येत्या आठ ते दहा दिवसात मंदिर,मशीद, बुध्दविहार,जैन मंदिर सुरू होणार, सरकारचे आभार' - प्रकाश आंबेडकर

पंढरपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'सरकारने आश्वासन पाळले नाही, तर आम्ही पुन्हा पंढरपुरात दाखल होऊ'

राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने पंढरपुरात आंदोलन केले. यावेळी प्रकाश आंबेडक यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते आणि वारकऱ्यांनी पंढरपुरातील विठ्ठल मंदिराबाहेर मोठी गर्दी केली होती. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी काही वारकऱ्यांसोबत मंदिरात जाऊन विठुमाऊलीचे दर्शन घेतले. 'मला मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या आठ दिवसात नियमावली जाहीर करुन राज्यातील मंदिरे, मशीद, बुध्दविहार, जैन मंदिर सुरू केली जाणार आहे, अशी माहिती आंबेडकरांनी दिली.

यावेळी आंबेडकर म्हणाले की, 'मला आणि 15 जणांच्या शिष्टमंडळाला दर्शन देण्यात आले. मंदिरं खुली करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. लोकांच्या भावनेचा आदर केल्याबद्दल मी सरकारचे आभार मानतो. आपण आठ ते दहा दिवस थांबू, दहा दिवसात आदेश आले नाही तर पुन्हा पंढरपुरात येणार,' असेही आंबेडकर म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, 'आम्ही रस्त्यावर लढणारी माणसे आहोत, पुन्हा या प्रश्नांवर आम्हाला लढायला लावू नका. इथले जिल्हाधिकारी, पोलिस कार्यालय यांनी जी भूमिका घेतली त्याबाबद्दल मी जाहीर अभिनंदन करतो. आपले आंदोलन या ठिकाणी थांबवतोय. ज्या शांतपणे आपण सहकार्य केले, त्याच पद्धतीने तुम्ही गावाला जा, 10 दिवसांनंतर पुन्हा यावे लागले तर तयारी ठेवा,'असेही आंबेडकर म्हणाले.

'आम्ही नियम मोडण्यासाठीच पंढरपुरात आलो आहेत'- प्रकाश आंबेडकर

या आंदोलनादरम्यान प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, 'आम्ही नियम मोडण्यासाठीच इथे आलो आहोत. मंदिरे उघडण्यासाठीच ही गर्दी जमली आहे. मंदिरे खुली करावी या लोकांच्या भावना आहेत. लोकं एकत्रित जमली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत नाही, हेच आम्हाला सरकारला दाखवायचे आहे. कोणतीही कारवाई करा आम्ही आंदोलन करणारच. मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे, आता त्यांची वाट पाहात आहे. त्यांचा निरोप काय येतो ते पाहू, त्यानंतर मी विठ्ठल मंदिरात जाऊ.'