आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायर रुग्णालयाचं शतक:नायर रुग्णालयाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्री ठाकरेंकडून 100 कोटींच्या निधीची घोषणा

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नायर रुग्णालयाचा आज शतकपूर्ती सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर मंत्री आणि अधिकारी उपस्थिती होते. यावेळी नायर रुग्णालयाला आज 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारकडून १०० कोटींचा निधी जाहीर केला आहे. कोरोनाच्या काळात सर्व डॉक्टर्ससह इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचं कौतुक करत त्यांचे आभार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडले.

'कोरोनाच्या काळात डॉक्टर अहोरात्र मेहनत घेत आहेत. मी पहिले ही बोललो होतो की, मंदिर, प्रार्थना स्थळे बंद आहेत. मग देव कुठे आहे? तर देव केवळ मंदिरात किंवा प्रार्थनास्थळात न राहता हा डॉक्टरांच्या रुपात आपला जीव वाचवण्यासाठी आलेला देव आहे. हा खरा देव आहे, जो आपला जीव वाचवतो आहे. रुग्णालय हे मंदिरासारखेच आहे. जसं आपण व्यथा घेऊन मंदिरात जातो, तसं कधीतरी आपण दुर्धर आजाराने ग्रस्त होऊन रुग्णालयात येतो. मग आपल्यावर उपचार केले जातात. त्यानंतर रुग्ण बरे होऊन घरी जातात. त्यामुळे कौतुकाचे खरे मानकरी डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांमुळे मुंबई मॉडेलसह महाराष्ट्राचे कौतुक केले जात आहे.’ यावेळीच उद्धव ठाकरे नायर रुग्णालयाला १०० कोटींचा निधी जाहीर केला.

बातम्या आणखी आहेत...